आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

श्रीलंकन खेळाडूला संघात न घेतल्यानं चाहते आले रस्त्यावर आणि सुरु केलं आंदोलन


श्रीलंका क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. उद्यापासून (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेने आपला संघी जाही केला असून यामध्ये भानुका राजपक्षे याला संधी न मिळाल्याने श्रीलंकेचे क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध आंदोलन करत श्रीलंका क्रिकेट मुख्यालयाबाहेर विरोध प्रदर्शन केलं आहे.

भानुका राजपक्षे २०२१ टी२० विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर चर्चेत आला होता. त्याने नोव्हेंबर, २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने श्रीलंका संघाकडून पाच एकदिवसीय आणि १८ टी२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय मध्ये त्याच्या नावावर ८९आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३२० धावा आहेत. त्याने जानेवारीमध्ये अचानक निवृत्ती घेतली, पण नंतर पुन्हा आपला निर्णय त्याने बदलला होता. दरम्यान आता त्याला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत.

वानिंदू हसरंगाही मालिकेला मुकणार

श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा  कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली असून अजून तो पूर्णपणे ठिक झाला नसल्याने तो तिन्ही टी२० सामन्यांना मुकणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या उद्या लखनौ येथे पहिला टी२० सामना खेळवला जाणार आहे. याआधी हसरंगाबाबत माहिती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून कळवण्यात आले की,”वानिंदु हसरंगा याला कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (२२ फेब्रुवारी) त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली असता त्या रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे.” दरम्यान श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here