आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

चक्क अनुष्का शर्माने नेटमध्ये केला गोलंदाजीचा सराव का ते जाणून घ्या…


बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर चाहत्यांना अभिनेत्री अनुष्का शर्माची झलक पहायला मिळाली आहे. अनुष्का पुन्हा एकदा स्क्रिनवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी तिने नेटमध्ये कसून सरावही सुरु केला आहे. अनुष्का ‘चकदा एक्सप्रेस’चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनुष्काने शुक्रवारी नेट प्रॅक्टीसचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ‘चकदा एक्सप्रेस’ हा भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावरील चित्रपट आहे. अनुष्का या चित्रपटात स्वत: झुलन गोस्वामीची व्यक्तीरेखा साकारणार आहे.

झुलन गोस्वामीने आयुष्यात कसा संघर्ष केला? तिने यश कसं मिळवलं? त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. यावर्षाच्या सुरुवातीला अनुष्काने या चित्रपटाची घोषणा केली होती. चकदा एक्सप्रेसच्या निमित्ताने अनुष्का शर्मा बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर परतणार आहे.

झुलनची गोलंदाजीची स्टाइल, व्यक्तीमत्व हुबेहूब तसंच वाटलं पाहिजे, यासाठी अनुष्का सध्या नेटमध्ये मेहनत घेतेय. तिने त्याचे काही फोटो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनुष्काने चेंडूवर ग्रीप पकडल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत गॉगल घालून ती गोलंदाजी करताना दिसते. ‘ग्रीप बाय ग्रीप’, चकदा एक्सप्रेसची तयारी असे अनुष्काने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोवर झुलन गोस्वामीने सुद्धा ‘व्हेरी नाइस’ अशी कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/CaY30hKJCAk/?utm_source=ig_embed&ig_rid=496d43c5-9b24-47d4-8e26-985d4e6789a2

हा खूप खास चित्रपट आहे. ही एक त्यागाची गोष्ट आहे. भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर प्रेरीत होऊन हा चित्रपट बनवण्यात येत आहे. महिला क्रिकेटबद्दल डोळे उघडणारा हा चित्रपट ठरेल असं अनुष्काने चित्रपटाची घोषणा करताना म्हटलं होतं.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here