आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दिग्गज खेळाडूने सांगितला रोहित, कोहली आणि धोनीच्या नेतृत्वातील फरक


ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील नेतृत्वशैलीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. हे तिघेही उत्कृष्ट कर्णधार कसे आहेत आणि तिघांमध्ये नेमका काय फरक आहे, ते वॉटसनने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दिलेल्या मुलाखतीत शेन वॉटसन म्हणाला की, रोहित हा एक सहज-सोपा अशा प्रकारातील नेता आहे, तर विराट कोहली हा सुपर ह्युमन आहे.

वॉटसन म्हणाला की, ‘रोहित शर्मा हा नैसर्गिक आणि सहज-सोपा नेता आहे. मी त्याला मुंबई इंडियन्समध्ये जवळून पाहिले आहे. दबावाखाली तो अविश्वसनीय काम करतो. मला रोहितची फलंदाजी बघायला आवडते, तो खूप एलिगंट खेळाडू आहे.

विराटबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘विराट कोहलीने एक नेता म्हणून अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत, त्याने कर्णधार म्हणून असणाऱ्या मर्यादा आणखी पुढे ढकलल्या आहेत. तो एक सुपर ह्युमन आहे. तो प्रत्येक सामन्यात विशेष ऊर्जा घेऊन येतो. क्रिकेटच्या बाहेरही तो संतुलित व्यक्ती आहे. त्याच्यासोबत आरसीबीमध्ये खेळणे माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता.’

वॉटसन कोहली आणि धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्ये येण्याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य राहिला आहे. आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये बोलताना त्याने धोनीबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ‘महेंद्रसिंह धोनीच्या नसांमधून बर्फ वाहतो, असे वाटते. दबावाला तो खूप चांगल्यारितीने हाताळतो. त्याला काहीही त्रास होत नाही. जरी गोष्टी आपल्या बाजूने होत नसल्या तरीही तो शांत असतो. तो सर्व खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि सर्वांचा आत्मविश्वासही वाढवतो.’


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here