आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
बनावट जाहिरात प्रकरणी मास्टर ब्लास्टर ला मनस्ताप! अशा गोष्टीचं समर्थन करणार नसल्याचे केले स्पष्ट
क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या एका गोष्टीने त्रस्त आहे. बनावट जाहिरात प्रकरणी सचिन तेंडुलकरचा फोटो वापरण्यात आला आहे. सोशल मीडियावर सचिनचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो कसिनोची जाहिरात करताना दिसतोय. दरम्यान यानंतर सचिनने स्वतः यावर प्रतिक्रिया देत अशा गोष्टींचं आपण समर्थन करत नसल्याचं सांगितलंय.
सचिनच्या सांगण्याप्रमाणे, ही बनावट जाहीरात असून सचिनची टीम याविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. सचिन म्हणतो की, मी कधीही वैयक्तिकरित्या दारू, जुगार तसंच तंबाखूचं समर्थन केलं नाही. माझ्या फोटोचा दुरूपयोग करणं दुःखद आहे. यासदंर्भात सचिनने ट्विट करत खुलासा केला आहे.
सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, माझ्या असं निदर्शनात आलंय की, सोशल मीडियावर अशा काही जाहिराती आहेत ज्यामध्ये माझा चेहरा मॉर्फ करून कसिनोची जाहिरात दाखवली जातेय. मात्र ती कधीही दारू, तंबाखू आणि जुगाराचं समर्थन केलं नाही. लोकांना भ्रमात पाडण्यासाठी माझ्या फोटोंचा गैरवापर केला जातोय. हे फार दुःखद आहे. सचिनने पुढे म्हटलंय की, माझी टीम या संपूर्ण गोष्टीवर कायदेशीर कारवाई करणार आहे. तोपर्यंत सर्वांना माहिती देणं गरजेचं आहे.
Requesting everyone to remain vigilant about misleading images on social media. pic.twitter.com/VCJfdyJome
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 24, 2022
कसिनोच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देताना सचिनने म्हटले, ”माझ्या लक्षात आले आहे, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत, ज्यामध्ये माझा चेहरा मॉर्फिंगद्वारे कसिनोची जाहिरात करताना दाखवण्यात आला आहे. मी वैयक्तिकरित्या दारू, जुगार किंवा तंबाखूचे कधीही समर्थन केले नाही, परंतु माझ्या फोटोंचा गैरवापर दुःखदायक आहे.”
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.