आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी मध्ये प्रेक्षकांना परवानगी, ही असेल तिकिटांची किंमत!


भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात सध्या ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर २ कसोटी सामने खेळले जातील. मालिकेमधील पहिली कसोटी ४ मार्चपासून मोहालीमध्ये सुरू होणार आहे. तर दुसरी कसोटी १२ मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळली जाईल. ही दिवस-रात्र कसोटी असून गुलाबी चेंडूमध्ये होणार आहे. या कसोटीपूर्वी क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. हा सामना पाहण्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशननं (KCA) या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

केसीएचे प्रवक्ते विनय मृत्यूंजय यांनी ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘कर्नाटक सरकारच्या सध्याच्या नियमानुसार बेंगलुरू दिवस-रात्र कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या आम्ही यापेक्षा जास्त प्रेक्षकांना प्रवेश देण्याची विनंती करणार नाहीत. यासाठी तिकीटांचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत. कर्नाटक स्टेट असोसिएसशनच्ये वेबसाईटवर १ मार्चपासून याची विक्री करण्यात येणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ६ मार्चपासून तिकीट विक्री सुरू होईल. या तिकीटांची किंमत १०० ते २५०० रूपयांच्या दरम्यान असेल. दुपारी २ ते रात्री ९च्या दरम्यान हा सामना होईल. या सामन्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रण देण्याचा विचार केसीए करत आहे.’

बंगळुरूमध्ये होणारी दिवस-रात्र कसोटी ही यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार विराट कोहलीच्या कारकिर्दीमधील १०० वी कसोटी होती. पण, त्यानंतर या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता मालिकेमधील पहिली कसोटी मोहालीमध्ये होणार असून ती विराटच्या कारकिर्दीमधील १०० वी कसोटी असेल. या मालिकेसाठी आर. अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार.

श्रीलंकन कसोटी संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पथुम निसांका, लाहिरु थिरिमाने, धनंजय डी सिल्वा, कुसल मेंडिस, एंजलो मैथ्यूज, दिनेश चंडीमल, चरित असलंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्व फर्नांडो, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रेमा आणि  लसिथ एम्बुलडेनिया


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here