आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मराठमोळ्या खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या टी-२० आधी संघात लागली या खेळाडूची वर्णी!


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज (दि. २६) दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघात एक बदल करण्यात आला. सलामीवीर मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या जागी मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता तो संपूर्ण मालिकेला मुकणार आहे.

भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मयांक अग्रवाल कसोटी मालिकेसाठी चंदीगड येथे दाखल झाला होता. त्याला आता ऋतुराज गायकवाडच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून धर्मशाळा येथे जाण्यास सांगितले आहे. तो आता शेवटच्या दोन टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात असेल.

मयांक अग्रवालने आतापर्यंत एकूण १६४ टी-२० सामने खेळले असले आणि तो आता पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार झाला असला तरी त्याला भारताकडून टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी अजून मिळालेली नाही. दुसरीकडे भारतीय टी-२० संघात मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडला स्थान मिळून देखील त्याला अंतिम अकराच्या संघात खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. त्याला वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत एका सामन्यात संधी मिळाली मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही.

सध्या मर्यादित षटकांच्या भारतीय संघात रोहित शर्मा, इशान किशन, शिखर धवन हे सलामीवीर असल्यामुळे मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडला संधी मिळेलच याची शाश्वती दिसत नाही. त्यातच तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. दुसरीकडे सातत्याने संधी मिळालेला इशान किशनने अखेर ८९धावांची खेळी केली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here