आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीय क्रिकेटपटूने झळकावले शानदार शतक; ते साजरे करण्यासाठी त्याचं शरीर मैदानात होत मन मात्र गमावलेल्या मुलीच्या दु:खात बुडालेले होते!


रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोद्याचा फलंदाज विष्णू सोळंकी याने शतक झळकावलं आहे. विष्णू चंदीगड विरूद्धच्या सामन्यामध्ये  दुसऱ्या दिवसाअखेर १०३ धावा काढून नाबाद होता. त्याच्या शतकामुळे बडोद्याचा संघ ४०० धावांच्या जवळ पोहचली आहे. विष्णूननं या शतकानंतर कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. त्याचं शरीर मैदानात होते, पण मन तिथं नव्हतं. त्याच्या लहान मुलीचं या मॅचपूर्वी निधन झालं होतं. विष्णूनं गेल्या काही दिवसांमध्ये एक वडील आणि क्रिकेटपटू म्हणून त्याची जबाबदारी पूर्ण केली आहे.

मुलीचे निधन झाल्याचा मोठा धक्का विष्णूला बसला होता. हे दु:ख पचवून तो संघामध्ये परतला. बडोद्याकडून पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या विष्णूनं १६१ चेंडूमध्ये १२ चौकारांच्या मदतीनं शतक झळकावलं. विष्णूच्या या खेळीद्दल प्रत्येक जण त्याला सलाम करत आहे. केकेआरचा क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन, मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशिर हट्टंगडी यांनी ट्विट करत विष्णूच्या धौर्याची प्रशंसा केली आहे.

११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री विष्णूच्या मुलीचा जन्म झाला. मुलगी झाल्याचा त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या २४ तासांमध्ये तिच्या मुलीनं या जगाचा निरोप घेतला. विष्णू त्यावेळी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी भुवनेश्वरमध्ये होता. मुलीच्या निधनाचे वृत्त समजताच तो तातडीने बडोद्याला गेला. मुलीवर अंत्यसंस्कर करून तो तीन दिवसांमध्ये संघामध्ये परतला आणि त्याने शतक झळकावले.

विष्णूच्या शतकामुळे चंदीगडच्या १६८ धावांना उत्तर देताना बडोद्यानं ७ बाद ३९८ असं चोख उत्तर दिलं. दुसऱ्या दिवसअखेरीसच बडोद्याकडं 230 धावांची भक्कम आघाडी होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here