आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एकाच सामन्यात शतक ठोकून जुळ्या भावांनी रचला इतिहास!


रणजी ट्रॉफी २०२२ च्या तामिळनाडू विरूद्ध चंदीगड सामन्यात जुळ्या भावांनी असा काही पराक्रम केला की त्यांचे नाव रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. तमिळनाडूच्या बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजीत या जुळ्या भावांनी एकाच सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला. प्रथम श्रेणी क्रिकेटमद्ये एका संघाविरूद्ध एकाच सामन्यात शतक ठोकणारी ही पहिलीच जुळ्या भावांची जोडी ठरली. रणजी ट्रॉफीमध्ये हे पहिल्यांदाच घडले.

गुरूवारी चंदीगडविरूद्धच्या सामन्यात बाबा इंद्रजीतने १२७ धावांची खेळी केली तर त्याचा जुळा भाऊ बाबा अपराजितने दमदार १६६ धावांची खेळी केली. या दोघांनी तमिळनाडूच्या पहिल्या डावातच शतके ठोकून कमाल केली. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात या जुळ्या भावांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बाबा अपराजितचा हा १० शंभर आहे तर इंद्रजीत त्याच्यापेक्षा थोडासा पुढे आहे. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११ शतके ठोकली आहे. चंदीगड आणि तमिळनाडूचा हा सामना नेहरू स्टेडियमवर खेळला जात आहे. तमिळनाडुकडून खेळणाऱ्या अपराजित आणि इंद्रजीत या जुळ्या भावांच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी देखील रचली. इंद्रजीत १२७ धावांवर बाद झाल्यानंतर अपराजितने किल्ला लढवत १६६ धावांची शतकी खेळी साकारली.

भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक भावांच्या जोड्यांनी कमाल केली आहे. सध्या भारतीय क्रिकेटवर्तुळात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या ही भावांची जोडी प्रसिद्ध आहे. आता इंद्रजीत आणि अपराजित या भावांची जोडी कधी भारतीय संघात दाखल होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणते केकेआरने बाबा इंद्रजीतला विकत घेतले असून त्याला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here