आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्र्याची वानखेडे मैदानाला भेट; आयपीएलचे आयोजन अभिमानास्पद असल्याचे केले नमूद


महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी वानखेडे स्टेडियमला ​​भेट दिली आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीचा आढावा घेतला. आयपीएलचे सामने २६ मार्चपासून महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये चार ठिकाणी होणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या सदस्याने पीटीआयला सांगितले, “आज माननीय मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी आयपीएल २०२२ची व्यवस्था करण्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन/बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली.”

”मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे आयोजन करताना महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मी आज वानखेडे स्टेडियमला भेट दिली, कारण आम्ही स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी उत्सुक आहोत. आम्ही सर्व संघांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहोत”, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

बीसीसीआयचे सीईओ आणि आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन, मुंबई टी-२० लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर आणि एमसीएच्या शिखर परिषदेचे सदस्य अजिंक्य नाईक आणि नदीम मेमन हेह आदित्य यांच्याशी चर्चेसाठी उपस्थित होते. “महाराष्ट्रासाठी ही एक मोठी क्रीडा स्पर्धा असेल,” असे सदस्य म्हणाले.

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी १० संघांचे गट जाहीर करण्यात आले आहे. हे संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध दोनदा आणि उर्वरित चार संघांविरुद्ध फक्त एकदाच खेळताना दिसेल. सर्व १० संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here