आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अटीतटीच्या सामन्यात हरमनप्रीतच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय


येत्या मार्च महिन्यापासून भारतीय महिला क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक २०२२ खेळायचा आहे. तत्पूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळून विश्वचषकाची तयारी करतो आहे. नुकताच रविवारी (२७ फेब्रुवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामना पार पडला. भारतीय संघाने २ धावांनी हा रोमांचक सामना जिंकला.

या सामन्यात भारताच्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित ५० षटकांत २४२ धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार सूने लूस हिने सर्वाधिक ८६ धावा केल्या. ९८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या मदतीने तिने या धावा जोडल्या होत्या. तसेच सलामीवीर लॉरा वॉल्वार्ड्टने ९५ चेंडूंमध्ये ८३ धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीदरम्यान तिने २ षटकार आणि ७ चौकार मारले होते.

या डावात भारताकडून राजेश्वरी गायकवाडने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. तिने १० षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर मेघना सिंग, स्नेह राणा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एता फलंदाजाला बाद केले होते.

तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४४ धावा जोडल्या होत्या. हरमनप्रीत कौर च्या शतकी खेळीचे यामध्ये मोठे योगदान होते. एका बाजूने कमी धावसंख्येवर भारतीय फलंदाज बाद होत असताना हरमनप्रीतने चिवट खेळी खेळली. तिने ९ चौकारांच्या मदतीने १०३ धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीसाठी तिने ११४ चेंडू घेतले. तसेच सलामीवीर यस्तिका भाटिया हिनेही अर्धशतक केले होते. तिने ५८ धावांचे योगदान दिले होते.

भारताच्या डावादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाकाने जबरदस्त गोलंदाजी केली. तिने २३ धावा देताना या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच शबनीम इस्माईल, मसाबाता क्लास, कर्णधार सुने लूस आणि क्लो ट्रायॉन यांनीही एक विकेट घेतली होती.

भारतीय संघाला बसला धक्का

या सामन्यादरम्यान भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. ती सलामीला फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा बाउंसर तिच्या डोक्याला लागला होता. ज्यामुळे ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर परतली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here