आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

लाहिरू कुमारचा बाऊंसर डोक्याला लागला आणि हा खेळाडू थेट रूग्णालयात दाखल झाला !


श्रीलंकेविरूद्धचा दुसरा टी-२० सामना भारताने जिंकून सिरीजही आपल्या नावे केली आहे. या सामन्यात सलामीला उतरलेला ईशान किशन फ्लॉप ठरला. मात्र फलंदाजी करताना गोलंदाज लाहिरू कुमारचा एक बाऊंसर किशनच्या थेट डोक्यावर जाऊन आदळला. यानंतरही ईशानने फलंदाजी केली. आऊट झाल्यानंतर मात्र ईशानला तातडीने रूग्णालयात दाखल करावं लागलं.

ईशानला हिमाचल प्रदेशातील कांगडा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचं स्कॅन करण्यात आलं. सध्या त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.

3.2 ओव्हरमध्ये लाहिरूने १४६ किमी वेगाने एक जोरदार बाउन्सर टाकला. हा बॉल थेट इशानच्या डोक्यावर जाऊन बसला. बॉल लागताच इशान हेल्मेट काढून जागीच बसला होता. लाहिरूचा चेंडू लागूनही फलंदाजी केली.

ईशानला बॉल लागल्यानंतर फिजियोने त्याची तपासणी केली. त्यानंतर ईशान फलंदाजी करण्यासाठी तयार झाला. मात्र यानंतर तो मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने १५ बॉलमध्ये १६ धावा केले.

भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतीय संघाला विजयासाठी १८४ धावांचं आव्हान दिले होतं.  भारतीय संघाने हे विजयी आव्हान ३ गडाच्या मोबदल्यात १७ चेंडूंआधी पूर्ण केलं. भारतीय संघाचा हा सलग ११ वा विजय ठरला. मुंबईकर श्रेयस अय्यर या विजयाचा हिरो ठरला.

भारताच्या डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ईशानला दुखापत झाली. लाहिरू कुमाराने टाकलेला बाऊन्सर थेट ईशानच्या हेल्मेटवर आदळला आणि त्यानंतर तो मैदानावर बसला. प्राथमिक उपचार घेऊन त्याने पुन्हा फलंदाजी केली. मात्र, १५ चेंडूंत १६ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर ईशानला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे वृत्ता दैनिक जागरणने दिले. डोक्यावर मार लागल्यानंतर स्कॅन केलं जातं.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here