आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बॉलीवूड,साउथ वर भारी पडतोय मराठमोळा “पावनखिंड” चित्रपट, बाजीप्रभूंच्या यशोगाथाने कमाईच्या बाबतीत केले हे मोठे विक्रम..


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपल्याला माहिती आहेत. अशीच एक शौर्यगाथा म्हणजे ‘पावनखिंड’ चा थरार. हा पावनखिंडचा थरार प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळत आहे.

गेल्यावर्षी म्हणजेच 10 जून 2021 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाचा हाहाकार पाहून ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यांनतर तब्बल सहा महिन्यांनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली होती. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘पावनखिंड’ च्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार 18 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम (box office collection) रचत सर्व चित्रपटगृहांच्या बाहेर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड लावल्याचं पाहायला मिळत आहे.

पावनखिंड

महाराष्ट्रात या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी तब्बल 1500 शो मिळाले होते. यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीत कोणत्याही चित्रपटाला एका दिवसात इतके शो मिळणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

अवघ्या चार दिवसात ‘पावनखिंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने तुफान कमाई करत नवा इतिहास रचला आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 2 कोटींची आणि लगेच तिसऱ्या दिवशी 3 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस दाखवले आहेत.

पावनखिंडने पहिल्या आठवड्यात विक्रमी शो चालवत तब्बल  10.97 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीलाच चित्रपटाने वेग वाढवला. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी एक कोटी तर दुसऱ्या दिवशी 1.98 कोटींची कमाई करत यशस्वी घोडदौड सुरु ठेवलीय.  शनिवार पर्यंत पावनखिंडने तब्बल 13.92 करोडच्या व्यवसाय केलंय. शिवाय रविवारी चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल चाललेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: १०० व्या कसो़टी सामन्यात ही परवानगी नाकारल्याने विराट कोहलीला बसला धक्का!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here