आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

१०० व्या सामन्यात ही परवानगी नाकारल्याने विराट कोहलीला बसला धक्का!


टी-२० मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसो़टी सामने होणार आहेत. ४ मार्चपासून पहिला कसो़टी सामना मोहालीत खेळवला जाईल. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (पीसीए) एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे या कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी मिळणार नाही.

हा सामना विराट कोहलीचा १००वा कसोटी सामनाही असेल. मोहाली आणि आसपासच्या कोविड-१९च्या ताज्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, बहुतेक भारतीय खेळाडू दुसऱ्या कसोटीच्या समाप्तीनंतर त्यांच्या संबंधित आयपीएल संघांमध्ये सामील होतील.

पीसीएचे वरिष्ठ कोषाध्यक्ष आरपी सिंगला यांनी शनिवारी सांगितले, “होय, बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ड्युटीवर असलेल्यांव्यतिरिक्त इतर प्रेक्षकांना कसोटी सामन्यांसाठी परवानगी दिली जाणार नाही. मोहालीमध्ये आणि आसपास करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षा प्रोटोकॉल स्वीकारले तर बरे होईल. जवळपास तीन वर्षांनंतर मोहालीत आंतरराष्ट्रीय सामना होत असल्याने चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.”

विराट कोहलीच्या चमकदार क्रिकेट कारकिर्दीचा हा गौरवशाली प्रसंग साजरा करण्यासाठी पीसीए संपूर्ण स्टेडियमवर ‘होर्डिंग’ लावली जाणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना ४ ते ८ मार्च दरम्यान मोहाली येथे होणार आहे. त्याचवेळी, १२ ते १६ मार्च दरम्यान बंगळुरूमध्ये दुसरा डे-नाईट कसोटी होणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here