आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का? राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे वादग्रस्त वक्तव्य, नवा वाद उफाळण्याची शक्यता.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर कायमच लोकांच्या मनात आहे. मराठ्यांच्या मनात छात्रपती चे स्थान हे कायमच आदराचे आहे. परंतु यांच महाराजांबद्दल राज्यचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ज्याचा निषेध सोशल मिडीयावर व्यक्त केला जातोय.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे. ‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?’ असं वक्तव्य त्यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे.

शिवाजी महाराज

याच बरोबर त्यांनी शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असं नाही. पण ज्या माणसाला गुरु नाही, त्याची महती उरत नाही, असंही वक्तव्य केलं आहे. समर्थ रामदासांच्या कृपेनं आम्हाला राज्य मिळालं असं शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं. त्याच बरोबर गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असंही समर्थ रामदासांना शिवरायांनी म्हटलं होतं, असं सुद्धा राज्यपालांनी यावेळी म्हटलंय.

या देशात गुरु अशी परंपरा आहे, की ज्याला सद्गुरु मिळाला म्हणजे सगळं काही मिळालं आणि सद्गुरु नाही मिळाला तर काहीच मिळालं नाही. समर्थांच्या शिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का?’ असं त्यांनी म्हटलंय. गुरुदक्षिणा म्हणून या राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं, असंही राज्यपालांनी दावा केला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here