आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या महान क्रिकेटपटूने रोहित-द्रविड ला इशारा देत मालिका विजयानंतर या त्रुटीवर ठेवले बोट!


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला सर्वात मोठा विक्रम केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप करून विश्वविक्रमाची बरोबरी केली. भारत आता सर्वाधिक सलग टी२० सामने जिंकणारा पहिला संघ बनला आहे आणि या बाबतीत अफगाणिस्तानची बरोबरी केली आहे. भारताने रविवारी धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत सलग बारावा टी२० सामना जिंकला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १२ सामने जिंकून भारत आणि अफगाणिस्तानचा संघ आता संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.

मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या टी२० मालिकेतील विजयात त्रुटी काढल्या आहेत. सुनील गावस्कर यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना एका मोठ्या गोष्टीचा इशारा दिला आहे.

दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला असला तरी या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत १८३ धावा केल्या. हर्षल पटेलने चार षटकांत ५२ धावा दिल्या, तर जसप्रीत बुमराहने चार षटकांत २४ आणि भुवनेश्वर कुमारने चार षटकांत ३६ धावा दिल्या. अखेरच्या षटकात श्रीलंकेच्या संघाने ७८ धावा केल्या.

गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारताने या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि अनेकदा मोठ्या धावांचे स्वीकारणे परवडणारे नाही, असे मत व्यक्त केले आहे. यावेळी गावस्कर यांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबद्दल आश्चर्य व्यक्त करत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कौतुक केले. “भारतीय संघ शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा देत आहे. अशा स्थितीत संघाने येथे या समस्येवर मात करणे आवश्यक आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांनी बुमराहसमोर चांगला खेळ केला. भारतीय संघ ज्या प्रकारे धावा देत आहे, त्याकडे द्रविड आणि रोहितने लक्ष देण्याची गरज आहे,” असे सुनील गावसकर म्हणाले.

ही चिंतेची बाब – सुनीव गावस्कर

“हे एका सामन्यात होऊ शकते, पण प्रत्येक सामन्यात असे घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. बुमराहविरुद्ध फटकेबाजी करणे सोपे नाही. भारतीय संघाला शेवटच्या षटकांमध्ये धावा देण्याचा विचार करावा लागणार आहे. पहिल्या १० आणि शेवटच्या आठ षटकांमध्ये कोणत्या गोलंदाजांनी गोलंदाजी करायची याचे नियोजन त्यांना करावे लागेल,” असे गावस्कर म्हणाले.

मात्र, सामन्यानंतर रोहित शर्मानेही यावर प्रतिक्रिया दिली. “येथे मला गोलंदाजांवर जास्त दबाव आणायचा नाही. अशा गोष्टी घडतात. सुरुवातीच्या षटकांत आम्ही चांगली गोलंदाजी केली पण शेवटच्या पाच षटकांत ८० धावा मिळाल्या. अशा स्थितीत शेवटच्या पाच षटकांमध्ये काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल,” असे रोहित शर्मा म्हणाला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here