आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेत आतापर्यंत या 5 फलंदाजांनी सर्वाधिक धावा काढल्यात..


अलीकडेच भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळली गेली, ज्यामध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा 3-0 ने क्लीन स्वीप केला. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारतासाठी या मालिकेत श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा यांनी बॅटने खूप धमाल केली आणि गोलंदाजांनीही खूप प्रभावित केले. आज आम्ही तुम्हाला या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल सांगत आहोत. ज्यांनी या मालिकेत चांगल प्रदर्शन करत धावांचा डोंगर उभारला होता.

श्रेयस अय्यर: या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारताचा श्रेयस अय्यर होता, ज्याने 3 सामन्यात एकूण 204 धावा केल्या. या मालिकेत त्याने 20 चौकार आणि 7 षटकारही मारले आणि तीनही सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला.

दसुन शनाका:  सर्वांधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या या यादीत श्रीलंकेचा दासुन शनाका दुसऱ्या क्रमांकावर आहे. दासुन शनाकाने या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये एकूण 124 धावा केल्या. या मालिकेत त्याने 11 चौकार आणि 7 षटकारही मारले.

ईशान किशन: भारताचा इशान किशन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला दोन सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने दोन डावात 105 धावा केल्या आणि 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

पाठुम निसंका: या यादीत चौथ्या क्रमांकावर पथुम निसांका आहे ज्याने तीन सामन्यांच्या तीन डावात 76 धावा केल्या आणि या मालिकेत 11 चौकारही मारले.

रवींद्र जडेजा: भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, त्याने 3 सामन्यात 70 धावा केल्या आहेत आणि 10 चौकार आणि 1 षटकारही मारला आहे.

या  5 फलंदाजांनी या मालिकेत सर्वाधिक धावा काढल्यात.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पाकिस्तानमधील प्रसिद्ध हिंदू मंदिरांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here