आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दारूच्या नशेत माजी क्रिकेटपटूने गाडी ठोकली; रात्री उशिरा पोलिसांनी केली अटक


भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या वांद्र्यात कांबळी यांनी दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला टक्कर मारली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र आता नंतर त्यांना जामीन मिळाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारदाराचं म्हणणं होतं की नशेत कांबळी यांनी आपल्या गाडीला टक्कर मारली आहे. यानंतर वांद्रा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. एएनआयच्या वृत्तानुसार, त्याने आपल्या सोसायटीच्या गेटलाही गाडी ठोकली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि नंतर जामीनही मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

विनोद कांबळी विरुद्ध कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३६ (स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे) आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर दारूच्या नशेत कार चालवून वांद्रे येथील एका सोसायटीच्या गेटवर टक्कर मारण्याचा आरोप आहे. विनोद कांबळीने राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर गाडीने टक्कर मारली. त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

याआधीही विनोद कांबळी अनेक वादांत अडकला आहे. २०१५ मध्ये त्याच्यासह पत्नीवर काम करणाऱ्या बाईने गंभीर आरोप केले होते. २०१५मध्ये विनोद व पत्नी एंड्रिया हेव्हिट यांच्याविरुद्ध एफ. आर. आय. दाखल झाला होता. काम करणाऱ्या बाईने कामाचे पैसे मागितले म्हणून तिला तीन दिवस खोलीत बंद केल्याचा आरोप दोघांवर होता. पण, या दोघांनी तिच्यावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केला. विनोद कांबळीने भारताकडून १७ कसोटी सामन्यांत ४ शतकं व ३ अर्धशतकांसह ५४.२०च्या सरासरीने १०८४ धावा केल्या आहेत. १०४ वन डे सामन्यांत त्याने २ शतकं व १४ अर्धशतकांसह २४७७ धावा केल्या आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here