आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुम्ही कधी चलाखीने उत्तर देऊन देखील ट्रोल झाला आहात का? उत्तरासाठी ही गोष्ट नक्की वाचा!


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिनेदेखील विराट आणि रोहित दोघांपैकी तिचा आवडता क्रिकेटपटू कोण याचे उत्तर सांगितलं आहे. भारतीय संघात सध्याच्या घडीला दोन स्टार क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. या आजी माजी कर्णधारांचे अगणित चाहते आहेत.

आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्या निमित्ताने ती एका मुलाखतीसाठी गेली असताना तिला क्रिकेटपटूंबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापैकी तुला कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक आवडतो, असा थेट प्रश्न आलियाला मुलाखतकाराने विचारला.

आलियानेही अतिशय ‘स्मार्ट’ उत्तर दिलं. ‘सध्याच्या घडीला मला रोहित शर्मा हा क्रिकेटपटू आवडतो पण विराट कोहली हा माझा ऑल टाईम फेव्हरिट क्रिकेटर आहे’, असं अतिशय हुशारीने आलियाने उत्तर दिलं. आलिया भट सुरूवातीच्या काळात एका मुलाखतीदरम्यान चुकीचं उत्तर दिल्याने ट्रोल झाली होती.

आलियाला कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान नाही, अशा आशयाचं ट्रोलिंग तिच्याबद्दल सातत्याने करण्यात आलं. विराट आणि रोहितवाल्या उत्तरानंतरही काही युजर्सने तिला ट्रोल करण्याचा आणि तिची खिल्ली उडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ‘आलियाने विराट किंवा रोहितचा एकही सामना पाहिला नसेल अन् क्रिकेटचे नियम तिला नक्कीच माहिती नसतील’, असं एकाने लिहिलं तर ‘आलिया स्वत: ला क्रिकेट जाणकार समजते का?’ असं ट्वीट एका युजरने केल्याचं दिसून आलं.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here