आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दोघांत तिसरा आणि जुन्या खेळाडूंना विसरा; बेंगलोर च्या कर्णधार पदासाठी त्या लाभाचा फायदा या क्रिकेटपटूला झाला!


आयपीएल 2022 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अजूनही काही संघांचे कर्णधार निश्चित होणं बाकी आहे. किंग कोहलीनं बेंगलोर चं कर्णधार सोडल्यानंतर पुढचा कर्णधार कोण होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. दिनेश कार्तिकचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मॅनेटमेंटचे पुन्हा एकदा कोहलीची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेंगलोर चं कर्णधार हे चेन्नई चा माजी आणि धोनीचा भरवशाच्या खेळाडूकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ग्लॅन मॅक्सवेलची देखील सर्वांना प्रतिक्षा आहे. मॅक्सवेल लग्नाच्या गडबडीत असल्याने आयपीएलच्या सुरुवातीचे सामने खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार पदाची धुरा देणार की नाही देखील पाहाणं गरजेचं आहे.

कोहली आणि दिनेश कार्तिक सोडून आता धोनीच्या भरवशाच्या खेळाडूचं नाव समोर येत आहे. बेंगलोर च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णधारपदाची जबाबदारी फाफ ड्यु प्लेसिसकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

जर फाफ ड्यु प्लेसिसकडे संघाचं कर्णधारपद गेलं तर दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीला देखील त्याचं म्हणणं मानावं लागणार आहे. या बाबत अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी असल्याने उत्सुकता वाढली आहे.

आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. 70 सामने एकूण 10 टीममध्ये खेळवण्यात येणार आहेत. 15 सामने पुण्यात तर उर्वरित सामने मुंबईतील 3 स्टेडियमवर होणार आहेत. यंदाच्या आयपीएलचं आणखी एक वैशिष्ट्यं आहे की यावेळी टायटल स्पॉन्सर टाटा असणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here