आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने ज्याच्या हातात ट्रॉफी दिली ती व्यक्ती कोण आहे?


भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्धची टी-२० मालिका ३-० या फरकानं जिंकली. भारतीय संघानं तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० संघामध्ये ६ विकेट्सनं विजय मिळवला. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला विजेतेपदाची चषक देण्यात आली. सामान्यपणे कर्णधार त्यानंतर संघामधील सर्वात नवीन खेळाडूच्या हातामध्ये चषक सोपवतो. पण, यंदा मैदानात वेगळंच चित्र दिसलं. रोहित शर्मानं भारतीय संघाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये चषक दिला.

रोहितनं चषक दिली ती व्यक्ती बीसीसीआयची प्रतिनिधी होती. जयदेव शहा असं त्यांचं नावं आहे. जयदेव सौराष्ट्राचे माजी कर्णधार असून बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा यांचे चिरंजीव आहेत.  जयदेव यांनी १२० फर्स्ट क्लास सामन्यामध्ये २९.९१च्या सरासरीनं ५ हजार ३५४ धावा केल्या. यामध्ये १० शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. जयदेव सध्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

टी-२० प्रकारामधला भारतीय संघाचा हा लागोपाठ १२ वा विजय आहे. टी-२० विश्वचषकामध्ये मध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा पराभव केला. यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० ने, वेस्ट इंडिजला ३-० ने आणि आता श्रीलंकेलाही ३-० ने धूळ चारली. टी-२० प्रकारामध्ये लागोपाठ सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे. याआधी अफगाणिस्ताननेही या प्रकारामध्ये लागोपाठ १२ विजय मिळवले होते.

रविवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने १६.५ षटकामध्ये ४ गडी गमावून केला. श्रेयस अय्यरने ४५ चेंडूमध्ये ७३ धावांची नाबाद खेळी केली, तर रवींद्र जडेजाही १५ चेंडूमध्ये २२ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेडकडून लाहिरु कुमाराने २ बळी घेतल्या, तर दुष्मंता चमीरा आणि चमिका करुणारत्नेला १ बळी घेण्यात यश आलं.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here