आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हा आहे जगातील एकमेव क्रिकेटपटू ज्याने कसोटीमध्ये एकाच सामन्यात शतक आणि हॅट्ट्रिक घेतलीय..


जेव्हा एखादा गोलंदाज सलग तीन चेंडूंत 3 बळी घेतो, तेव्हा ती हॅट्ट्रिक असते आणि कोणत्याही खेळाडूसाठी ही हॅट्ट्रिक घेणे खूप अभिमानास्पद असते. त्याचबरोबर शतक झळकावून जास्तीत जास्त धावा करण्याची फलंदाजाची इच्छा असते. पण त्याच सामन्यात एखादा क्रिकेटरही हॅट्ट्रिक घेऊन शतक झळकावू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण जगात असा एक क्रिकेटर आहे ज्याने हा चमत्कार करून दाखवलाय.

तो क्रिकेटर म्हणजे बांगलादेश क्रिकेट संघाचा दिग्गज सोहाग गाझी, ज्याचा जन्म ५ ऑगस्ट १९९१ रोजी झाला. सोहाग गाझीने 2012 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. पण 2013 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने इतकी अप्रतिम कामगिरी केली की त्याने इतिहास रचला.

क्रिकेटपटू

ऑक्टोबर 2013 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सोहाग गाझीने नाबाद 101 धावांची खेळी केली होती. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 469 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने पहिल्या डावात 501 धावा केल्या. यानंतर जेव्हा सोहाग गाझी गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने न्यूझीलंडच्या कोरी अँडरसन, बीजे वॉटलिंग आणि डग ब्रेसवेल यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. शिवाय जेव्हा तो फलंदाजीस आला तेव्हा त्याने अप्रतिम कामगिरी करत त्याच डावात आपलं शतक पूर्ण केल.  क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत अशी कामगिरी कुणीही करू शकलं नव्हत.

यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू ठरला, ज्याने त्याच सामन्यात शतक आणि हॅट्ट्रिकही केली. या पराक्रमाची पुनरावृत्ती कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. त्याचा हा विक्रम आजही तसाच आहे…


हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here