आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

टी-20 सामन्यांत या 5 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत सर्वांत जास्त झेल घेतलेत..


क्रिकेटच्या खेळात गोलंदाज आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करणे पुरेसे नसते. क्षेत्ररक्षकांनाही चांगले क्षेत्ररक्षण करावे लागते. क्षेत्ररक्षकांनी खराब क्षेत्ररक्षण केल्यास त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेतलेल्या टॉप-5 भारतीय क्रिकेटर्सबद्दल सांगत आहोत.

रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये, रोहित शर्माने आतापर्यंत 50 झेल पकडले आहेत आणि तो भारताकडून आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू देखील आहे.

विराट कोहली: या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 43 झेल घेतले आहेत.

झेल

सुरेश रैना: सुरेश रैना हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीत 42 झेल घेतले आहेत.

हार्दिक पांड्या: स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 झेल पकडले आहेत.

रवींद्र जडेजा: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यंत 22 झेल घेतले आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here