आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

IPL मधील मुंबई इंडियन्स संघाच्या जलदगती गोलंदाजाला आता फिरकीपटू होण्याची वेळ आली, आता रोहित काय करणार?


आयपीएल २०२२ च्या मोसमाला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्यामुळे लवकरच प्रत्येक देशाचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतात येतील. सध्या काही खेळाडू त्यांच्या देशासाठी तर काही जण वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत आहेत. मुंबई इंडियन्सनचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी-१० ब्लास्टमध्ये (Trinidad T10 Blast) खेळत आहे. यातल्या एका सामन्यात पोलार्डने ऑफ स्पिन गोलंदाजी केली आणि एक बळीही घेतला. आयपीएल २०२२ साठी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिटेन केलं. आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ वेळा चषक जिंकला, या पाचही वेळा पोलार्ड मुंबईच्या संघाचा भाग होता.

कायरन पोलार्डने स्कार्लेट स्कॉचर्सकडून खेळताना सोआ किंगविरुद्ध एका षटकात गोलंदाजी केली आणि एक बळीही घेतला. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यामध्ये सोआ किंगने पहिले खेळताना ३ गडी गमावून १५० धावा केल्या. सुनिल नारायणने १३ चेंडूमध्ये 33 धावांची खेळी केली. याशिवाय जेसन मोहम्मद २१ चेंडूमध्ये ५५ धावांवर नाबाद राहिला.

सोआ किंगच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कार्लेटने ८ षटकामध्ये ३ गडी गमावून ८० धावा केल्या, पण पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. पोलार्ड ६ चेंडूमध्ये ८ धावा करून बाद झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार सोआ किंगचा ४२ धावांनी विजय झाला.

११ हजार धावा, ३०० पेक्षा जास्त बळी

३४ वर्षांच्या कायरन पोलार्डच्या नेतृत्वात काहीच दिवसांपूर्वा वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आली होती, पण दोन्ही मालिकेमध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी लाजिरवाणी झाली. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्ये भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश केलं.

पोलार्डने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ५१५ डावामध्ये ३२ च्या सरासरीने ११,४२७ धावा केल्या, यामध्ये एक शतक आणि ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १५२ च्या सरासरीने फलंदाजी केली, तसंच ७६४ षटकार देखील मारल्या आहेत. पोलार्डने गोलंदाज म्हणून ३६९ डावामध्ये २५ च्या सरासरीने ३०४ बळी घेतल्या. १५ धावा देऊन ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच त्याचा इकोनॉमी रेटही ८ पेक्षा जास्त आहे. ७ वेळा त्याने ४ बळी घ्यायचा विक्रम केला आहे. तसंच तो वेस्ट इंडिजकडून १०० टी-२० आंतरराष्ट्रीय खेळणारा पहिला खेळाडूही आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here