आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

युक्रेन आणि रशिया युद्धातील हल्यातून बचावलेल्या इंग्लंडच्या केविन पीटरसनची कहाणी


इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर केविन पीटरसनच कुटुंब रशियाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं. पीटरसनचं कुटुंब युक्रेनमध्ये होतं. रशियाने हल्ला केला, त्यावेळी आपलं कुटुंब युक्रेनमध्ये होतं, अशी माहिती पीटरसनने सोशल मीडियावर दिली आहे. पीटरसनची पत्नी आणि मुलं कसेबसे युक्रेनमधून निसटण्यात यशस्वी ठरले. रशियन हल्ल्याच्यावेळी पीटरसनच कुटुंब युक्रेनमध्ये अडकलं होतं. पीटरसनची पत्नी आणि मुल बऱ्याच प्रयत्नानंतर सीमा ओलांडून पोलंडमध्ये दाखल झाले आहेत. पीटरसनने सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे. पीटरसनने पोलंड सरकारचे आभार मानले आहेत. पोलंडने चार लाख युक्रेनियन नागरिकांना आपल्या देशात शरण दिली आहे.

“युक्रेनी लोकांसाठी पोलंड चांगली जागा आहे. माझ्या कुटुंबाने यूक्रेनची सीमा पार करुन पोलंडमध्ये प्रवेश केला आहे, थँक्यू पोलंड” असं पीटरसनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. “केविन पीटरसनची पत्नी जेसिकाने सुद्धा पोलंडचे आभार मानलेत. तुम्ही आमच्या कुटुंबाला जो आश्रय दिला, दया दाखवली त्या उपकारांची नुसती आभार मानून परतफेड होणार नाही” असं जेसिकाने म्हटलं आहे.

रशियाने युक्रनेवर २४ फेब्रुवारीला हल्ला केला होता. युद्धाचा आज सहावा दिवस आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये घुसलं आहे. आज किंवा उद्यापर्यंत कीव रशियन फौजा ताब्यात घेऊ शकतात. रशियाच्या या आक्रमकतेला जगभरातून विरोध होतोय. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत.

भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा

रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्याच्या परिस्थितीत युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त आहे. युक्रेनमध्ये वास्तव्य करीत असलेल्या भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचा सल्ला युक्रेनच्या भारतीय दुतावासाने दिला आहे. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातील १२ रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने अगदी मोठं पाऊल उचललं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

कीव राजधानीतील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं अनेक नागरिक व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत युक्रेन सोडलं असून ते भारतात परतले आहेत. अजूनही काहीजण तिथं अडकले असल्याची माहिती मिळत आहे. भारतासह अनेक देशांचे नागरिक तिथं राहत असून अनेकांनी आत्तापर्यंत देश सोडलाय तर अनेकजण देश सोडण्यासाठी मार्ग शोधत आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here