आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तब्बल ४३२५ मिनिटे खेळपट्टीवर टिकून राहणाऱ्या या भारतीय फलंदाजाचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता!


१९ वर्षीय मोहितेने गेल्या आठवड्यात ७२ तास पाच मिनिटे खेळपट्टीवर टिकून राहिला. मोहितेने हमवतन विराग मानेचा सात वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला. दरम्यान, त्याच्या या वर्ल्ड रेकॉर्डल गिनीज बुकाची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. मुंबईचा युवा क्रिकेटर सिद्धार्थ मोहितेने ७२ तासच पाच मिनिटे नेटमध्ये फलंदाजी करत वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. तो सर्वाधिक काळ खेळपट्टीवर टिकून राहणारा खेळाडू बनला आहे.

विराग मानेने ५० तास सलग फलंदाजी केली होती. १९ वर्षीय मोहितेने गेल्या आठवड्यात ७२ तास पाच मिनिटे खेळपट्टीवर टिकून राहिला. मोहितने याबाबत सांगितले, मला बऱ्याच दिवसांपासून हा रेकॉर्ड करायचा होता. माझे प्रयत्न यशस्वी ठरले याचा मला आनंद आहे. मी असे करून लोकांना दाखवू शकतो की मीही काहीतरी करू शकतो. मोहितला ७२ तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करण्यात त्याचे कोच ज्वाला सिंह यांनी मदत केली.

मोहितेला हे करण्यास सगळ्यांनी नकार दिला होता. मात्र त्याने आपली जिद्द पूर्ण केली. मला सर्व लोक नाही म्हणत होते. मी ज्वाला सरांना संपर्क केला. त्यांनी मला साथ दिली. सोबतच ज्या गोष्टींची मला गरज होती ती त्यांनी पूर्ण केली. मोहितेला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजांचा एक समूह होता.

नियमांनुसार मोहितेला प्रत्येक तासानंतर पाच मिनिटांसाठी आराम देण्यात आला होता. त्याची फलंदाजी रेकॉर्डही करण्यात आली होती. गिनीज बुकात नोंद होण्यासाठी त्याचे रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत. मोहितेने सांगितले की कोरोनामुळे माझी दोन वर्षे वाया गेली होती. यामुळे मला वेगळे काही करायचे होते.

कोच ज्वाला सिंह म्हणाले, मोहिते कोरोना महामारीआधी एमसीसी प्रो ४० लीगचा सदस्य होता. त्याच्या आईने माझ्याशी संपर्क केला. मात्र लॉकडाऊनमुळे सगळं काही बंद झाले होते. यानंतर त्याने माझ्याशी संपर्क केला होता. मीही यासाठी तयार नव्हतो. मात्र मला माहीत होते की अनेक खेळाडूंची दोन वर्षे कोरोनामुळे वाया गेली आहेत. यासाठी मी त्याच्यासोबत वेगळे काही करण्यास तयार झालो.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here