आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आफ्रिदीला खेळताना खास करून तो कर्णधार असताना राग का येत होता ?
आमच्या महावितरणच्या कॉलनीत राजा नावाचा एक पोरगं होतं, तो गडी भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी तो व्रत-उपवास ठेवायचा. राजाच्या आईचा आणि क्रिकेटचा तेवढाच संबध होता, जेवढा वीरेंद्र सेहवागचा फलंदाजीचं ताण-तणाव या गोष्टीशी. एका संध्याकाळी राजाच्या आईच्या शिव्या कानावर पडल्या. या शिव्या दोघांना उद्देशून होत्या… एक राजा आणि दुसरा शहीद आफ्रिदी. आफ्रिदीनं भारताच्या हाता- तोंडाशी आलेला सामना काढला आणि याच्यामुळं आपलं पोरगं जेवलं नाही, म्हणून राजाची आई आफिदीचं खानदान काढत होती.
क्रिकेट बघताना आपण सगळ्यांनीच राजाच्या आई सारखे बनत कधी ना कधी आफ्रिदीला शिव्या घातल्यात. खोटं कशाला बोला? शिव्या घालायची कारणं तशी हजार असली, तरी आफ्रिदी मैदानात आला की त्याला बघणं हा लई भारी पण तितकाच टेन्शनचा विषय होता.. हे शंभर टक्के.
आपल्याकडं पाकिस्तानचा एखादा खेळाडू आवडतो म्हणालं, तरी लोकं रागानी बघतात. पण शोएब अख्तर, इंजमाम उल हक, जहीर अब्बास, सोहेल तन्वीर, युनुस खान आणि शाहीद आफ्रिदी यांचं क्रिकेट आपण एन्जॉय करयचो. त्यातल्या त्यात आफ्रिदीचा तर स्वॅगच वेगळा होता.
सगळ्या क्रिकेट जगतात लाला नावानं फेमस असलेला आफ्रिदी म्हणजे ६ फुट उंची, मानेवर रुळणारे लांब केस आणि काहीसं पुढं आलेलं पोट. लालानी कधी फिटनेस वैगरेकडे लक्ष दिलं असेल असं त्याच्या शरीराकडे बघून वाटायचं नाही, पण साहेब वयाच्या ४२ व्या वर्षीपर्यंत क्रिकेट खेळले, तेही ताकदीनं. यंदाच्या पीएसएलमध्येही आफ्रिदी खेळला, नशीब आमच्या राजाच्या आईनं पाहिलं नाही…
सचिन म्हटलं की स्ट्रेट ड्राईव्ह आठवतो, विराट म्हणालं की कव्हर ड्राईव्ह… पण शाहीद आफ्रिदी म्हणालं की डायरेक्ट सिक्स आठवतात.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.