आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

IPL की PSL; तुम्हाला काय वाटत कोणती लीग जिंकल्यावर किती करोडो रुपये मोजत असेल?


पाकिस्तान सुपर लीग २०२२चा हंगाम नुकताच संपला आहे. लाहोर कलंदर्सने फायनल सामन्यात मुल्तान सुल्तानला मात देत पहिल्यांदा खिताब जिंकला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. येथे शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांनी आपल्या जादुई गोलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली.

पीएसएलमध्ये शाहीन शाह आफ्रिदी पहिल्यांदा नेतृत्व करत होता आणि त्याने हे आव्हान स्वीकारताना संघाला विजय मिळवून दिला. १३ सामन्यांमध्ये २० विकेटसह या गोलंदाजाने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवल्या. त्याशिवाय शादाब खान, मोहम्मद हाफीज, फखर जमां आणि शोएब मलिक यांनीही जबरदस्त कामगिरी केली.

परदेशी खेळाडूंमध्ये अॅलेक्स हेल्स, जेसन रॉयल, रशीद खान आणि टीम डेविड सारखे प्रभावी खेळाडू होते. ही सर्व नावे इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२च्या हंगामात दिसलीत. आयपीएल २०२२, २६ मार्चपासून सुरू होत आहे. क्रिकेटच्या क्षेत्रातही भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने दोन्ही देशांदरम्यानच्या टी-२० लीगची तुलना केली जाते.

आयपीएलमध्ये खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. दुसरीकडे पीएसएलनेही गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, पीएसएलमध्ये भारतीय खेळाडूंना खेळण्यासाठी परवानगी नाही आहे. दुसरीकडे दोन्ही देशांदरम्यान राजकीय तणाव असल्याकारणाने पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत नाहीत. यासाठी चाहते आणि तज्ञ नेहमी दोन्ही देशांदरम्यानच्या टी-२० लीगच्या गुणवत्तेबाबत वाद घालत असतात.

दोन्ही लीगमध्ये भाग घेणारे विदेशी खेळाडू आपली प्रतिक्रिया देत असतात. दरम्यान फ्रेंचायझी स्पर्धांमध्ये पुरस्काराची रक्कम मोठी भूमिका निभावगतात. पीएसएल आणि आयपीएलमध्ये दोन्ही स्पर्धांमध्ये परदेशी खेळाडू असतात. मात्र या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेमध्ये मोठी तफावत असते. लाहोर कलंदर्सने पीएसएल २०२२ जिंकल्यानंतर तब्बल ८० मिलियन म्हणजेच साधारण ३.४० कोटी रूपये मिळवले. तर आयपीएल २०२२च्या विजेत्या संघाला तब्बल २० कोटी मिळणार आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here