आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

महिला विश्वचषकाच्या यजमानांना नमवत कॅरेबियनची विजयी सलामी


महिला विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत वेस्ट इंडीज महिलांनी यजमान न्यूझीलंडला पराभूत केले. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीज महिलांनी ३ धावांनी विजय नोंदवत स्पर्धेत विजयी सलामी दिलीये. अखेरच्या षटकात न्यूझीलंड महिला संघाने तीन गडी गमावले.

पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने निर्धारित ५० षटकात २५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या महिला संघाला २५६ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीच्या लढतीत न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेविन हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

 

यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्याने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेला शुक्रवारपासून दिमाखदार सुरुवात झाली. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० वाजता मैदानात उतरले. यंदाच्या विश्वचषकात सर्व सामन्यांत डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीने दिली.

कोरोना महामारीमुळे आयसीसीने महिला विश्वचषकाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, जर एखाद्या संघात कोरोनाचे जास्त प्रकरणे नोंदवली गेली आणि ११ खेळाडू पूर्ण झाले नाहीत, तर तो संघ देखील ९ खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो. भारतीय संघ दोन वेळा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.

२००५ मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून तर २०१७ मध्ये इंग्लंडने अंतिम फेरीत पराभव केला होता. आतापर्यंत तीन संघांनी महिला विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. इंग्लंड ४ वेळा चॅम्पियन बनले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे.

महिला विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या संघाला ६ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच ४.५० कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला गट टप्प्यातील प्रत्येक सामन्यासाठी ३ लाख यूएस डॉलर (२.२५ कोटी रुपये), ७० हजार डॉलर (५२.५५ लाख रुपये) दिले जातील. यावेळच्या महिला विश्वचषकाची बक्षीस रक्कम ३.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (रु. २६.२७ कोटी) आहे. जे गेल्या विश्वचषकापेक्षा ११.२६ कोटी रुपये जास्त आहे. ही रक्कम ७५ टक्के अधिक आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here