आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
बालपणीच्या नायकाकडून सत्कार, पत्नीचा भावनिक आधार आणि १०० व्या कसोटीचं जंगी सेलिब्रेशन आणि काय हवं!
”तू लहान असताना तुला भारतासाठी किमान एक कसोटी समाना खेळता यावा असे वाटायचे अन् आज तू १०० वा कसोटी सामना खेळत आहेस. या खेळातील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा हा एक पुरावा आहे… शिस्त, धैर्य, कौशल्य, जिद्द, इच्छा, एकाग्रता हे सर्व तुझ्याकडे आहे. तुझा प्रवास अतिशय सुंदर झाला. केवळ १००वा कसोटी सामना खेळल्याचाच नव्हे तर या संपूर्ण प्रवासाचा तुला अभिमान वाटायला हवा, तुम्ही नेव्हिगेट केलेल्या महान प्रवासाचाही अभिमान वाटायला हवा,” असे गौरोद्गार भारताचा माजी कर्णधार व आताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने काढले.
भारत-श्रीलंका यांच्यातल्या मोहाली कसोटीपूर्वी द्रविडच्या हस्ते १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीचा सत्कार करण्यात आला. यावेळी विराटसह पत्नी अनुष्का शर्माही ही उपस्थित होती. द्रविड पुढे म्हणाला,” तुझे आणि तुझ्या कुटुंबीयांचे अभिनंदन. आशा करतो की ही पुढे तुझ्याकडून होणाऱ्या आणखी विक्रमांची सुरूवात असेल. ड्रेसिंग रुममध्ये आपण २००व्या कसोटीबाबत बोलत होतो.”
What a moment to commemorate his 100th Test appearance in whites 🙌🏻
Words of appreciation from the Head Coach Rahul Dravid and words of gratitude from @imVkohli👏🏻#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/zfX0ZIirdz
— BCCI (@BCCI) March 4, 2022
विराट कोहलीनेही द्रविडचे आभार मानले. तो म्हणाला,”हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझी पत्नी इथे माझ्यासोबत आहे. माझा भाऊ, माझे कुटुंबीय, माझे लहानपणीचे कोच हे सर्व स्टेडियमवर उपस्थित आहेत. खूप अभिमान वाटतोय. सर्व सहकाऱ्यांचे आभार, तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते. हा सांघिक खेळ आहे आणि तुमच्याशिवाय हा प्रवास अशक्य आहे. बीसीसीआयचेही आभार, त्यांनी मला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली.”
तो पुढे म्हणाला,”ही कॅप यापेक्षा योग्य व्यक्तिकडून मला मिळालीच नसती, तुम्ही माझे बालपणीचे नायक आहात. १५ वर्षांखालील एनसीए च्या दिवसाच्या तो फोटो अजूनही माझ्या घरात आहे. जेव्हा तुमच्यासोबत फोटो काढत असताना माझे लक्ष तुमच्याकडे होते आणि आज तुमच्याकडून मला १००व्या कसोटीची कॅप मिळतेय.”
२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.