आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘या’ पाच खेळाडूंमुळे एमएस धोनीचं पाचव्या विजेतेपदाचं स्वप्न भंग पावणार?


इंडियन प्रिमियर लीगच्या इतिहासातील चेन्नई सुपर किंग्स (CSK) सर्वात यशस्वी संघ आहे. नेहमीच त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिलं आहे. CSK च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही गोष्ट सहज लक्षात येते. चेन्नईचा संघ प्लेऑफ मध्ये आतापर्यंत ११ वेळा पोहोचला आहे. नऊ वेळा स्पर्धेची फायलन गाठली आहे तर चारवेळा स्पर्धेचं जेतेपद पटाकवलं आहे. यलो आर्मी यंदा पुन्हा एकदा IPL चे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो.

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावामध्ये CSK ने अनुभवी आणि युवा खेळाडूंच संतुलन साधणारा संघ निवडला आहे. भविष्यात काही खेळाडू CSK साठी स्टार बनू शकतात. स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ चेन्नईकडे असल्याचं माजी क्रिकेटपटू आणि एक्सपर्ट आकाश चोप्रा यांचं मत आहे. सकारात्मक गोष्टींबरोबर सीएसकेच्या काही कमकुवत बाजू सुद्धा आहेत.

ज्यामुळे आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळवण्याची त्यांची संधी हुकू शकते. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये चेन्नईचे हे पाच खेळाडू तुम्हाला संघर्ष करताना दिसू शकतात. आयपीएल २०२२ मेगा लिलावामध्ये चेन्नईने ख्रिस जॉर्डनला संघात घेतलं आहे. हा गोलंदाज CSK ची कमकुवत बाजू ठरू शकतो. इकोनॉमीच्या हिशोबाने जॉर्डन महागडा गोलंदाज आहे. त्याची सरासरी २७.९२ आहे, तर इकोनॉमी ९.१२ आहे. दीपक चहरला दुखापत झाली आहे. त्यामुळे ख्रिस जॉर्डनवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाऊ शकते. CSK साठी हा गोलंदाज जास्त फायद्याचा ठरण्याची शक्यता कमी आहे.

मुंबईत जन्मलेल्या शिवम दुबेकडे भारतीय क्रिकेटमधील पुढचा स्टार म्हणून पाहिले जाते. पण अजून त्याला अपेक्षानुसार कामगिरी करता आलेली नाही. रवींद्र जाडेजासोबत त्याच्याकडे फिनिशरची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पण कामगिरीत सातत्य नसल्यामुळे CSK साठी तो कितपत ही जबाबदारी निभावेल, या बद्दल शंका आहे. शिवमने काही सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. पण बहुतांश मॅचेसमध्ये सामान्य दर्जाचा परफॉर्मन्स राहिला आहे. १२०.५४ त्याचा स्ट्राइक रेट आहे.

दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटी रुपये मोजून विकत घेतलं आहे. सीएसकेसाठी त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण सध्या तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकण्याचीही शक्यता आहे. दीपक चहर कधी खेळणार, या बद्दल कुठलीही स्पष्टता नाहीय. त्यामुळे CSK च्या अडचणी वाढू शकतात.

दीपक चहरप्रमाणे ऋतुराज गायकवाडही या सीजनला मुकण्याची शक्यता आहे. ऋतुराजच्या मनगटाला दुखापत झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याआधी अचानक ऋतुराजच्या मनगटाला ही दुखापत झाली. ऋतुराजने मागच्या सीजनमध्ये चेन्नईसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. ऋतुराज दुखापतीतून कधीपर्यंत सावरेल, या बद्दल अजूनतरी स्पष्टता नाहीय.

महेश तीक्ष्णा सुद्धा सध्या दुखापतीचा सामना करतोय. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला भारत-श्रीलंका टी-२० सीरीजमध्ये खेळता आलं नाही. वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील या स्टेडियम्सवर फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवण्याची शक्यता कमी आहे. या विकेटस फ्लॅट असून सीमारेषा जवळ आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here