आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

क्रिकेट इतिहासात ३०० विकेट्स घेणारी अनिसा ही केवळ चौथी खेळाडू! तर या आहेत पहिल्या ३ खेळाडू


आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात वेस्ट इंडिजची फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदने तिने १० षटकात ६० धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या.

झुलन गोस्वामी नंतर अनीसा आता ३०० क्लबमध्ये पोहोचली

महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आजही भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे. झुलनने आतापर्यंत ३४५ आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत तर अनीसा आता ३०० क्लबमध्ये पोहोचली आहे आणि अशी कामगिरी करणारी ती चौथी गोलंदाज ठरला आहे. महिला क्रिकेटमध्ये अनिसाच्या आधी केवळ तीन गोलंदाजांनी ३०० विकेट घेतल्या होत्या. झुलन आणि अनिसाच्या आधी कॅथरीन ब्रंटच्या नावावर ३१२ आणि एलिस पेरीने ३०८ विकेट्स घेतल्या आहेत. अनिसा आता ३०० बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तसेच ३०० बळी घेणारी ती पहिलीच फिरकीपटू ठरली आहे.

वेस्ट इंडिजची विजयी सुरुवात

आय सी सी  महिला विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा तीन धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ९ बाद २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २५६ धावांवर ऑलआऊट झाला. यजमानांना अखेरच्या षटकात सहा धावा करता आल्या नाहीत. ११९ धावा करणाऱ्या २३ वर्षीय हेली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here