आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

राहुल द्रविडने तेव्हाही कर्णधार असताना तेंडुलकरला… आणि आत्ताही रविंद्र जडेजा सोबत कोच असताना द्विशतक होऊ नाही दिले!


काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर मैदानात खेळत असताना राहुल द्रविड कर्णधार होता. त्यावेळी सचिन १९४ धावांवर खेळत असताना राहुल द्रविडने संघाचा डाव घोषित केला होता. त्या मुद्द्यावरून द्रविडवर अनेकांनी टीका केली होती.

भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना मुलतान येथे ऐतिहासिक टेस्ट ला सुरुवात झाली होती. त्या सामन्यात गांगुली पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर होता तर द्रविड जेमतेम ६ धावा काढून बाद झाला होता. मैदानावर सचिन सेहवागची अस्सल जोडी जमली होती. त्यादिवशी सेहवागने चौकार षटकारांचा पाऊस पाडत दणदणीत त्रिशतक साजरे केले आणि त्याचवेळेस सचिनने १९० आकडा गाठला होता. त्यावेळेस टीम मिटिंग मध्ये ठरल्या नुसार शेवटची १५ षटके पाकिस्तानला खेळायला देण्याची ठरले होते. अगदी काही चेंडू शिल्लक असताना युवराज सिंग बाद झाला आणि राहुल द्रविड ने डाव घोषित केला आणि सचिनचे द्विशतक अधुरे राहून गेले.

यावर द्रविड एकच मात्र मोलाचे वाक्य बोलून गेला, “ मला पाकिस्तानला थोडा वेळ खेळायला बोलावून हेच दाखवून द्यायचे होते की आम्ही येथे जिंकायला आलो आहोत वैयक्तिक रेकॉर्ड करायला नाही”. आणि खरोखरच भारताने तो सामना जिंकून दाखवला.

त्यानंतर आज श्रीलंकेविरूद्ध २२८ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकार खेचत १७५ धावा करणाऱ्या जाडेजालाही डाव घोषित करत द्रविडने माघारी बोलवलं. यामुळे नेटकरी द्रविडवर भलतेच संतापल्याचं दिसून आलं.

भारतीय फलंदाजांनी पहिल्या कसोटीत तुफान फटकेबाजी करत श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. रविंद्र जाडेजाच्या नाबाद १७५, रिषभ पंतच्या ९६, रविचंद्रन अश्विनच्या ६१ आणि हनुमा विहारीच्या ५८ धावांच्या बळावर भारताने ८ बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला. श्रीलंकन गोलंदाजांची तुफान धुलाई केल्याने भारतीय गोलंदाजांचं कौतुकच झालं पण या दरम्यान सोशल मीडीयावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यावर काही नेटकरी टीका करताना दिसून आले. सचिन तेंडुलकर प्रमाणेच रविंद्र जाडेजालाही द्रविडमुळेच द्विशतकापासून वंचित राहावं लागलं अशा आशयाच्या भावना व्यक्त करत लोकांनी द्रविडवर संताप व्यक्त केला.

जडेजाने कपिल देव यांच्याबरोबरच अॅडम गिलख्रिस्ट आणि इयान हिली यांना देखील मागे टाकले. गिलख्रिस्टने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत १६२ तर हिली यांनी १६१ धावांची खेळी केली होती. तर डेरेक विलियम रान्डेल (१६४), दिनेश रामदीन (१६६) यांना देखील मागे टाकले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी सातव्या क्रमांकावर फलंदजीला येत २७० धावांची खेळी केली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here