आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पाकिस्तान च्या संघातील यष्टीरक्षक, गोलंदाज आणि फलंदाजांच्या माकड उड्या ३० वर्षानंतरही चाहत्यांच्या लक्षात राहिल्या आहेत!


बरोबर ३० वर्षापूर्वी आजच्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषक मध्ये भिडले होते. नेहमीप्रमाणे हा सामना खूप उत्कंठावर्धक झाला होता. मात्र या सामन्यात एक किस्सा घडला होता. भारताचा यष्टीरक्षक किरण मोरे आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज जावेद मियांदाद यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. ही घटना क्रिकेट इतिहासात अजरामर झाली आहे. जे व्हा केव्हाही पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख होतो त्यावेळी ही घटना पहिल्यांदा आठवली जाते.

भारताचे यष्टीरक्षक किरण मोरे यांना विकेटच्या मागून काही ना काही बडबडत राहण्याची सवय होती. तसेच त्यांची अपिल देखील जोरदार असायची. तो अपिल करताना उड्या मारायचे. दुसरीकडे पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांना क्रिकेटच्या मैदानावर काही अतरंगी गोष्टी करण्याची खोड होती.

१९९२च्या विश्वचषक मध्ये भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरचा एक चेंडू जावेद मियांदाद यांच्या पॅडवर जाऊन आदळला. त्यावेळी विकेटच्या मागे असणाऱ्या किरण मोरेने जोरदार अपिल केली. मात्र अंपायरने ही अपिल फेटाळून लावली. मात्र मोरेंची ही जोरदार अपिल मियांदाद यांच्या डोक्यात गेली होती.

याच षटकात जावेद मियांदादना किरण मोरे यांनी पुन्हा एकदा धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न देखील फसला. त्यावेळी मियांदाद यांनी विकेटवर माकड उड्या मारण्यास सुरूवात केली. त्यांनी खरं तर किरण मोरेंची नक्कल करण्याच्या प्रयत्न केला होता. हा किस्सा क्रिकेट इतिहासात अजरामर झाला. आजही लोक या घटनेचा व्हिडिओ पाहून हसतात.

२००७ साली गौतम गंभीर फलंदाजी करत असताना अगदी उलट झालं होतं. कामरान अकमल ने माकड उड्या मारल्या होत्या ज्यावेळी गंभीर फलंदाजी करत होता. टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यातील हा प्रकार होता. तसेच सईद अजमलने सचिन तेंडूलकर विरोधात २०११ च्या विश्वचषकात पायचीत केले होते पण रिव्हूमध्ये मात्र नाबाद तिसऱ्या पंचांकडून ठरवण्यात आले. त्यावेळी देखील षटक संपल्यानंतर त्याने रागात उड्या मारल्या.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here