आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जडेजा द्विशतकाच्या जवळ असतांना डाव घोषित केल्यामुळे लोकानी रोहित आणि द्रविडचा बाजार उठवलाय.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना ) मोहाली येथे सुरू आहे. हा सामना विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना आहे आणि सर्वांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. कोहलीला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नसली तरी सर रवींद्र जडेजाचा मास्टर क्लास प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

जडेजा पहिल्या दिवशी 45 धावा करून नाबाद परतला पण आज त्याने शानदार फलंदाजी करत चौफेर फटके खेळले. त्याने आधी शतक झळकावले आणि नंतर 150 धावांचा टप्पाही पूर्ण केला. तो ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून हा अष्टपैलू खेळाडू त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतकही झळकावेल असे वाटत होते.

रविंद्र जडेजा

मात्र, तसे झाले नाही आणि चहापानापूर्वी कर्णधार रोहित शर्माने 574/8 धावांवर डाव घोषित केला. त्यावेळी जडेजा 228 चेंडूत 175 धावांवर नाबाद होता. या निर्णयानंतर ट्विटरवर यूजर्सनी रोहित शर्मा तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ट्रोल केले.

रोहित आणि प्रशिक्षक द्रविड यांचा हा निर्णय लोकांना आवडलेला  नाही असच दिसतंय.चला तर पाहून यावर आलेल्या काही मजेदार प्रतिक्रिया..

 

अश्या अनेक मिम्सच्या माध्यमातून लोकांनी आपला राग व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता डाव घोषित करण्याचा निर्णय लोकांना आवडलेला नाहीये असचं दिसतंय.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here