आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

८७ वर्षांच्या काळात रणजी चषकात ‘या’ खेळाडूंनी कमावले आहेत सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून नावलौकिक!


रणजी चषकाचा पहिला सामना ८७ वर्षापूर्वी १९३४-३५ साली खेळला गेला होता. रणजी चषक साधारण ८७ वर्षापूर्वी सुरू झाला. आजपर्यंत साधारण पाच हजार सामने खेळले गेले आहेत. रणजी ट्रॉफीचा हा प्रवास प्रत्येक खेळाडूला आणि चाहत्यांसाठी खास अनुभव देणारा आहे.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ५००० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रणजी ट्रॉफी ही भारतातील सर्वोत्तम क्रिकेट चॅम्पीयनशीप आहे. भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघामध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जातात. यामध्ये एकूण 38 संघ सामने खेळतात.

ते संघ आंध्र, आसाम, बड़ौदा, बंगाल, छत्तीसगढ़, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, जम्मू एवं कश्मीर, झारखंड, कर्नाटक/मैसूर, केरल/त्रावणकोर-कोचीन, मध्य प्रदेश/मध्य भारत / होल्कर / मध्य भारत, महाराष्ट्र, मुंबई, ओडिशा, पंजाब, रेल्वे, राजस्थान/राजपूताना, सौराष्ट्र/नवानगर, सर्विसेस/आर्मी, तमिलनाडु/मद्रास, त्रिपुरा, उत्तर प्रदेश/संयुक्त प्रांत, विदर्भ या प्रांतांचे प्रतिनिधित्व करतात.

रणजी सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वसीम जाफर याच्या नावे आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेत १२ हजार ३८ धावा केल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. सर्वाधिक १५५ सामने, सर्वाधिक ४० शतके, एकाच वर्षात ७ शतके करण्याचा पराक्रम अशी अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. रणजी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम राजेंद्र गोयल यांच्या नावे आहे. १९५८ पासून १९८५ पर्यंत ६४० विकेट घेण्याचा विक्रम आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचा दबदबा राहिला आहे. मुंबईच्या संघाने सर्वात जास्त वेळा म्हणजे तब्बल ४१ वेळा रणजी ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. काही वर्षापासून मुंबई संघाचा प्रभाव कमी झालेला आहे. मुंबई संघाने शेवटचा किताब २०१५-१६ या वर्षी जिंकला होता.यानंतर मुंबईचा संघ रणजी सामन्यात अंतिम सामन्या पर्यंत पोहचला नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here