आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुम्हाला माहित आहे महिला विश्वचषक सुरु होण्यामागे नक्की कोणती गोष्ट कारणीभूत ठरली?


न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाला नुकतीच सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस महिला क्रिकेटची लोकप्रियता खूप वाढली आहे. मात्र तरी, महिला क्रिकेटच्या तुलनेत पुरुषांच्या क्रिकेटला नेहमीच जास्त महत्त्व दिले गेले आहे आणि आजही तशीच परिस्थिती आहे.

इतिहासात पुरुषांचा विश्वचषक जेव्हा खेळला जात नव्हता, तेव्हापासून महिला विश्वचषक खेळला जात आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेची सुरुवात १९७५ मध्ये झाली होती. पुरुषांचा विश्वचषक सुरू होण्याच्या दोन वर्ष आधी महिला विश्वचषकाला सुरुवात झाली होती.

तर १७७१ मध्ये, जेव्हा इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा कर्णधार रेचल हेहो फ्लिंट, महिला क्रिकेटचे आवड असेलेले आणि त्याकाळच्या श्रीमंत व्यक्तिंपैकी एक जॅक हेवर्ड यांच्या घरी थांबल्या होत्या. त्यावेळी जेव्हा बैठकीत ब्रँडीची बॉटल उघडली गेली आणि दोघांमध्ये महिला क्रिकेटविषयी चर्चा सुरू झाली; यादरम्यान महिला क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याविषयी चर्चा झाली आणि यातुनच पुढे महिला विश्वचषक खेळवला जावा असा निर्णय घेण्यात आला.

या दोघांमधली अशी चर्चा झाली की, महिला विश्वचषक खेळवला जावा, ज्यामुळे खेळात सुधारणा होऊ शकेल. हा विश्वचषक फिफा कपच्या धरतीवर खेळवण्याविषयी चर्चा केली गेली होती. त्याकाळात महिला क्रिकेटची अवस्था खूपच खराब होती. अवस्था अशी होती की, क्रिकेटपटू खेळण्यासाठी होणारा खर्च स्वतः उचलत होत्या. विश्वचषकाच्या आयोजनातून परिस्थिती सुधारू शकत होती, पण प्रश्न असा होता की, यासाठी पैसा येणार कुठून. हेवर्डने यावेळी शब्द दिला की, जर विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित केला गेला, तर ते स्वतः ४०,००० पाउंड्सची मदत करतील. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती.

त्यानंतर पहिली महिला विश्वचषक स्पर्धा १९७३ साली इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली होती. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पावसाने आडकाठी आणली होती आणि सामना रद्द केला गेला. विश्वचषक स्पर्धेत अनेक जागांवर हेवर्डचे नाव आयोजकांच्या रूपात लावले गेले होते. १४ जून १९७३ रोजी सर्व संघांच्या उपस्थितीत पहिल्यांदा विश्वचषकाची सोनेरी ट्रॉफी सर्वांसमोर आणली गेली. ट्रॉफीच्या शेजारीच हेवर्ड उभा होते.  ही पहिली महिला विश्वचषकाच स्पर्धा २० जून ते २८ जुलैदरम्यान खेळली गेली. पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. तसेच अंतिम सामन्यातही इंग्लंडने बाजी मारली आणि ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या राज हराण्यातील प्रिन्सेस ऍनी सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होत्या. त्यांना पाहून इंग्लंड संघाच्या कर्णधार हेहो फ्लिंट खूपच घाबरल्या. रेचल हेहो फ्लिंट त्यांच्या काळातील दिग्गज फलंदाज होत्या. परंतु, राजघराण्याच्या प्रिन्सेसला पाहून त्यांची अवस्था खूपच खराब झाली होती.

हेहो फ्लिंटसाठी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, पहिली एक धाव करण्यासाठी त्यांना चार षटकांचा सामना करावा लागला. असे असले तरी, थोड्या वेळात त्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवले आणि ५० धावांची मोठी खेळी केली. विश्वचषक जिंकल्यानंतर प्रिन्सेस ऍनीने त्यांना ट्रॉफी दिली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here