आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात बाळाला घेऊन मैदानात खेळण्यासाठी उतरणाऱ्या या खेळाडूला तुम्ही ओळखलंत का?


आयसीसी महिलांच्या क्रिकेट विश्वचषकाला ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये आज दिनांक ६ मार्च ला भारत विरूद्ध पाकिस्तानी महिला संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरल्या आहेत. या महामुकाबल्यामध्ये एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारूफ हिचा. तिच्या या फोटोने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांकडून बिस्माह मारूफचं कौतुक होतंय. सामना खेळण्यापूर्वी बिस्माह तिच्या ७ महिन्यांच्या मुलीला घेऊन स्टेडियममध्ये पोहोचली होती. तिची मुलगी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये खूप गोड दिसत होती.

बिस्माह मारूफचा मुलीसोबतचा फोटो आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलाय. या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या असून बिस्माह मारूफच्या पॅशनचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.

28 नोव्हेंबर 2018 साली बिस्माहने अबरार अहमद नावाच्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधली. अबरार पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. क्रिकेटर होणं बिस्माहचं स्वप्न नव्हतं तर डॉक्टर बनण्याची तिची इच्छा होती.

30 वर्षांची बिस्माह मारूफ फिरकी अष्टपैलू आहे. तिने गेल्या वर्षी 30 ऑगस्टला मुलीला जन्म दिला. यानंतर ती काही काळ क्रिकेटपासूनही दूर होती. तर आज ती स्टेडियममध्ये मुलीसोबत दिसली.

भारताने या सामन्यात २४४ धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघासमोर ठेवले असून स्नेह राणा, पूजा वस्त्रकर आणि स्म्रिती मानधना ची अर्धशतके ही या डावाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तब्बल १०७ धावांनी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here