आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

२००३ विश्वचषकाच्या होस्टने तब्बल १९ वर्षानंतर शेअर केला धक्कादायक अनुभव!


२००३ साली आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची ती कामगिरी जशी सर्वांना लक्षात आहे तसाच तो विश्वचषक आणखी एका गोष्टीमुळे सर्वांना लक्षात राहिला ते म्हणजे मंदिरा बेदी. तेव्हा ती स्पर्धेचे अधिकृत ब्रॉडकास्टर सोनी मॅक्सच्या खास एक्स्ट्रा इनिंग्स कार्यक्रमाची सूत्रधार होती.

तेव्हा मंदिरा बेदीने तेव्हा क्रिकेटमध्ये ग्लॅमरचा तडका दिला होता. मंदिराचे अँकरिंग प्रेक्षकांना देखील आवडले होते. पण आता १९ वर्षानंतर तिने अँकरिंग करतानाचे अनुभव शेअर केलेत. क्रिकेटपटू मला बघत रहायचे. मी जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा ते टक लावून बघायचे, असे मंदिराने सांगितले. मंदिराने २००३ सोबत २००७च्या वर्ल्डकपचे देखील अँकरिंग केले होते. २००४ आणि २००६ ची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मंदिराचा ग्लॅमर दिसत होता. तर आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात देखील मंदिरा दिसली होती.

क्रीडा विश्लेषण, मुलाखतींच्या वेळी नेमकं काय घडायचं, याबाबत सांगताना मंदिरा म्हणाली, “माझ्याकडे बरेच क्रिकेटपटू नजर रोखून पाहायचे. ही काय आम्हाला विचारणार… असाच त्यांचा अविर्भाव असायचा. ते जी उत्तरं द्यायचे ते माझ्या प्रश्नाशी संबंधित नसायचे. माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत भीतीदायक होता. माझा आत्मविश्वास कोलमडला होता. पण, माध्यम प्रसारकांनी मला धीर दिला.

तुमची निवड २०० महिलांमधून करण्यात आली आहे, तुम्ही उत्तमच आहात. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा”, असं त्यांनी तिला सांगितल्याचं मंदिरा म्हणाली. एका महिलेला सोबतचे विश्लेषक आणि खेळाडूही स्पोर्ट्स अँकर म्हणून स्वीकारू शकत नव्हते, असं मंदिरानं स्पष्ट केलं.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here