आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
त्याच्या चाहत्याच्या एका हाकेला साद देणाऱ्या कोहली चा हा दिलदारपणा सर्वजण कायम लक्षात ठेवतील!
विराट कोहली ने १००व्या कसोटी सामन्यात विजय मिळवून एका वेगळ्या पंक्तित स्थान पटकावले. अनिल कुंबळे, व्ही व्ही एस लक्ष्मण, हरभजन सिंग, इशांत शर्मा यांच्यानंतर १००व्या कसोटीत विजय मिळवणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी १ डाव व २२२ धावांनी जिंकली.
विराटने १०० कसोटींत ५०.३५च्या सरासरीने ८००७ धावा केल्या आहेत आणि त्यात २७ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून कसोटीत ८००० धावा करणारा तो सहवा फलंदाज ठरला. त्याने १६९ डावांमध्ये हा विक्रम केला. सचिन तेंडुलकर ( १५४ डाव), राहुल द्रविड ( १५८), वीरेंद्र सेहवाग ( १६०) व सुनील गावस्कर ( १६६ ) यांनी विराटपेक्षा कमी धावांत कसोटीत ८००० धावा केल्या आहेत.
Virat Kohli gifted a jersey to India's unofficial 12th man Dharmveerpal – nice gesture from Kohli. pic.twitter.com/qjDLybVZ5O
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2022
विराट कोहली आपल्या चाहत्याला कधी नाराज करत नाही. या गोष्टींचा अनुभव आपल्याला बऱ्याच वेळा आलेला आहे. अगदी भारत विरुद्ध श्रीलंकेच्या पहिल्या कसोटीनंतर देखील अशीच एक घटना पाहायला मिळाली.
— Elijah Impey (@BreatheRaina) March 7, 2022
मोहाली येथे झालेल्या सामन्यानंतर विराट जेव्हा भारतीय संघाच्या बसमध्ये चढत होता तितक्यात धरमवीरपाल या टीम इंडियाच्या अनधिकृत १२व्या खेळाडूने विराटला हाक मारली. त्यानंतर विराट त्याच्या फॅनला भेटायला आला आणि स्वतःची जर्सी त्याला भेट म्हणून दिली. त्याच्या या दिलदारपणाचा व्हिडिओ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.