आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बॉल ग्लोव्हजला असा चिकटून बसला होता की, तो सहज निघतही नव्हता काय घटना आहे वाचा..


क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा मैदानात अजब-गजब गोष्टी घडतात. ज्यावर विश्वास बसत नाही. एखाद्या षटकात धावा पळून काढताना, चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा रन आऊटच्यावेळी असं काही घडत की, मैदानावरच्या पंचांनाही नेमका काय निर्णय द्यायचा, ते कळत नाही. क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा मैदानात अजब-गजब गोष्टी घडतात. ज्यावर विश्वास बसत नाही.

एखाद्या षटकात धावा पळून काढताना, चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा रन आऊटच्यावेळी असं काही घडत की, मैदानावरच्या पंचांनाही नेमका काय निर्णय द्यायचा, ते कळत नाही. अशीच घटना न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्डकप स्पर्धेत घडली. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणभर तुम्हालाही विश्वास बसणार नाही, हे असं कसं घडलं? पण सोमवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामन्या दरम्यान अशी घटना घडली. न्यूझीलंडची विकेट किपर कॅटे मार्टिनला (Kate Martin) फिल्डरने केलेला थ्रो वेळेत मिळाला. तिला बांगलादेशची फलंदाज लता मोंडालला रन आऊट करण्याची संधी होती. पण त्यावेळी असं काही घडलं की, तुम्हालाच प्रश्न पडेल. हे कसं होऊ शकतं.

नामी संधी चालून आलेली

बांगलादेशच्या डावात २६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली. मार्टिनला लताला रनआऊट करण्याची नामी संधी चालून आली होती. न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकाने अचूक थ्रो केला होता. चेंडू वेळेत मार्टिनला मिळाला होता. तिने तिच्याबाजून रनआऊट करण्याचाही प्रयत्न केला. पण चेंडू ग्लोव्हजला चिकटून बसला. त्यामुळे लता धावबाद होण्यासापासून बचावली. पावसामुळे हा सामना ५० ऐवजी २७ षटकांचा खेळवण्यात आला.

https://www.instagram.com/reel/CayeOR7oMUe/?utm_source=ig_embed&ig_rid=fe14df9d-32c1-4dfa-8a59-211ac25b9528

बुक्के मारुन चेंडू पाडावा लागला

चेंडू ग्लोव्हजला असा चिकटून बसला होता की, तो सहज निघतही नव्हता. अखेर मार्टिनने हाताने बुक्के मारले, तेव्हा तो चेंडू ग्लोव्हजमधून खाली पडला. या प्रकाराने मैदानावरील प्रेक्षकांसह कॉमेंटेटर सर्वचजण चक्रावून गेले. आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामन्यातील या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. बांगलादेशने या सामन्यात २७ षटकात आठ विकेट गमावून १४० धावा केल्या. न्यूझीलंडने हे आव्हान आरामात पार केलं. नऊ विकेट आणि ४२ चेंडू राखून न्यूझीलंडने हा सामना जिंकला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here