आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुम्ही कधी भर मैदानात क्षेत्ररक्षण करताना पॅन्ट फाटल्याचे पहिले आहे का? या सामन्यात असेच घडले आणि पुढे…


ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. बाबर आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे, तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी एक ‘फाडू’ किस्सा घडला. मैदानात क्षेत्ररक्षणासाठी आलेला पर्यायी खेळाडू शान मसूदची याची पॅन्ट फिल्डिंग करताना फाटली. त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. बाबर आझमकडे पाकिस्तान संघाची तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानच्या एका खेळाडूची पँट फाटलेली होती. यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या खेळाडू शान मसूद याची पँट फाटलेली दिसली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर खेळाडूचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. काही नेटकऱ्यांनी थट्टा उडवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही काही नेटकऱ्यांनी नाशाणा साधला.

पाकिस्तानच्या चार बाद ४७६ धावा –

पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात ४७६ धावा चोपल्या. अजहर अलीने १८५आणि इमाम उल हकने १५७ धावांची खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी २०८ धावांची भागिदारी केली.

ऑस्ट्रेलियाचे प्रत्युत्तर –

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तान संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागिदारी केली. ख्वाजाने ९७ आणि वॉर्नरने ६८ धावांचे योगदान दिले.  मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ आणि कॅमरन ग्रीन यांनीही दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. लाबुशेनने ९०, स्टीव स्मिथ 78 आणि ग्रीनने 48 धावाच योगदान दिले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here