आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हे पुरावे पाहून तुम्हाला देखील पटेल, रोहित च्या मनात विराट बद्दल कुठलाही राग नाही की द्वेषही नाही!


रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार झाल्यापासून भारताने प्रत्येक मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा टी-२० मालिकेत पराभव केला. तसेच एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. भारताने रविवारी मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना तीन दिवसात जिंकला. भारताने एक डाव आणि २२२ धावांनी हा सामना जिंकला.

विराट कोहलीसाठी हा सामना खास होता. कारण तो आपल्या कसोटी कारकिर्दीमधील १०० वा कसोटी सामना खेळत होता. भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे यात विराट कोहलीला सन्मानित करत असल्याचेही फोटो आहेत. विराट आणि रोहित मध्ये सुप्त स्पर्धा असून त्यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या नेहमी मीडियामध्ये येत असतात. त्यामुळे रोहितने विराटचे फोटो पोस्ट करण्याचं एक वेगळ महत्त्व आहे. पहिल्याकसोटीआधी हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटला स्पेशल कॅप भेट देऊन सन्मानित केलं.

रोहित शर्माच्या या पोस्टनंतर फॅन्सही भावूक झाले आहेत. रोहितने विराटला गार्ड ऑफ ऑनरही दिला. रोहित शर्माने विराटसाठी १०० वा कसोटी सामना विशेष बनवणार असल्याचं म्हटलं होतं. मैदानावरही त्याने तसंच केलं. रोहित शर्माला पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करता आली नाही. पण कसोटीमध्येही कर्णधार म्हणून त्याने विजयी सुरुवात केली आहे. रोहित शर्माने कर्णधारपदाची जबाबदारी संभाळल्यापासून भारतीय संघ सातत्याने यशाची कमान चढतोय.

संघ हरला की प्रश्न निर्माण होतात

राजकुमार शर्मा यांच्या मते, रोहित शर्मा खूप नशिबवान आहे. कारण त्याला कर्णधारपदाच्या सुरुवातीला सोप्या मालिका मिळत आहेत. जेव्हा संघ हरतो, तेव्हा आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. संघ हरला की, कर्णधाराच्या चुका मोजल्या जाऊ लागतात. रणनीती चुकली, त्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पाठवायला हवे होते, चार किंवा पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरायला हवे होते. भारतीय संघावर अशी वेळ कधी न येवो, अशी मी प्रार्थना करतो. संघ असाच जिंकत राहो आणि विश्वचषकाचे विजेतेपदही आपल्या नावावर करो.” रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकून भारताने विजयी हॅट्रिक पूर्ण केली.

विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आता तो तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. भारताला त्याच्याकडून खूप आशा आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्मासमोर सर्वात मोठे लक्ष्य टी-२० विश्वचषक स्पर्धेचे असणार आहे.

रोहित शर्मा आहे गांगुलीच्या मार्गावर

रोहित शर्मा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मार्गावर असल्याचे शर्मा यांना वाटते. ते म्हणाले की, ‘रोहित शर्मा प्रत्येक युवा खेळाडूसाठी ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण ठेवतो. तुम्ही हुशार आहात, त्यामुळे तुम्ही टीम इंडियापर्यंत पोहोचला आहात, असा विश्वास रोहितने तरुणांना दिला. तरुण खेळाडूसाठी ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण असणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा हा वारसा पुढे नेत आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली याची सुरुवात झाली होती, असे मला वाटते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here