आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला व्हायचं होत ‘कपिल देव’ सारखं; मात्र या कारणामुळे त्याचे स्वप्न राहिले अपूर्ण!


कपिल देव यांनी १९८३ साली भारताला पहिला विश्वचषक जिंकवून दिला आणि ते सर्वांचेच हिरो ठरले. बऱ्याच तरुणांनी कपिल यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला आणि त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सध्या भारतीय संघात असलेल्या एका खेळाडूलाही कपिल देव यांच्यासारखे व्हायचे होते, पण त्याचे हे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही, नेमका काय घडलं पाहा… कपिल देव होण्याचे स्वप्न सध्याच्या भारतीय संघातील एका दिग्गज खेळाडूने उराशी बाळगले होते. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

भारतीय संघातील दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा सध्या भारतातील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेनंतर तो भारताचा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे, पण लहानपणी त्याला फिरकीपटू बनायचे नव्हते. अश्विनने वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न पाहिले होते. नुकताच त्याने अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि पहिला विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांचा ४३४ कसोटी बळींचा विक्रम मोडला आहे. अश्विनने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. हा त्याच्या कारकिर्दीतील ८५ वा कसोटी सामना होता.

रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून बोलताना सांगितले की, ”खूप आनंद वाटत आहे. २८ वर्षांपूर्वी, मी माझ्या वडिलांसोबत कपिल पाजींचा जयजयकार करत होतो, जेव्हा त्यांनी रिचर्ड हॅडलीचा विक्रम मागे टाकला होता. मी माझ्या स्वप्नातही कपिल देव यांचा विक्रम मोडण्याचा कधी विचार केला नाही. कारण मी वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून मला फलंदाज व्हायचे होते.

१९९४ मध्ये फलंदाजी मला आवडत होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटमध्ये उदयास येत होता. मला पुढचा ‘कपिल देव’ व्हायचं होतं. वडिल्यांच्या सल्ल्यानुसार मी लहानपणी फलंदाजीसह मध्यम गतीने गोलंदाजीही करत होतो. तेव्हापासून मी ऑफस्पिनर बनून इतकी वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा कधीच विचार केला नव्हता. मी भारतासाठी खेळेन, असे कधीच वाटले नव्हते.”

दरम्यान, कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यात ४३४ बळी घेतले आहेत. तर अनिल कुंबळेने १३२ कसोटी सामन्यांत भारताकडून सर्वाधिक ६१९ बळी घेतले आहेत. ४०० हून अधिक बळी घेणारा अश्विन हा चौथा भारतीय फिरकी गोलंदाज आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो नववा गोलंदाज ठरला आहे. त्याने नुकतेच न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली आणि श्रीलंकेच्या रंगना हेराथ यांचेही विक्रम मोडीत काढले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here