आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पुरुषांनंतर आता महिला क्रिकेटपटूंचे चित्रपट लवकरच बॉलिवूडला अच्छे दिन आणणार!


आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘शाबाश मिट्ठू’च्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. ‘शाबाश मिट्ठू’ हा भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर येणारा बायोपिक आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे.

“शतक झळकावल्यानंतर मिताली राजची जी स्टाइल आहे, ती या पोस्टरमधून दाखवण्यात आली आहे. यात तिचा जर्सीनंबर 3 दिसतो. तिने आपल्या बॅटने क्रिकेट बदलून टाकलं. अनेक साचेबंद गोष्टी तिने मोडल्या. ती आजही अनेकांना प्रेरणा देतेय” असे वायकॉम 18 ने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

भारतीय प्रेक्षकांना बॉलिवूड आणि क्रिकेट आवडतं. या चित्रपटद्वारे क्रिकेटपटूंवरील बायोपिकला अजून बळ मिळेल. एमएस धोनीच्या बायोपिकनंतर क्रिकेटपटूंवरील चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. सर्वातआधी सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री कम बायोपिक आला. ‘सचिन – अ बिलियन ड्रीम्स’ असं या डॉक्युमेंट्रीच नाव होतं. हा बायोपिक प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. मागच्यावर्षी पहिल्या वर्ल्डकप विजयावर ’83 द फिल्म’ हा चित्रपट रिलीज झाला. त्याला सुद्धा प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर चकदा एक्सप्रेस

पुरुष क्रिकेटपटूंनंतर निर्मात्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या आयुष्यावरील चित्रपटांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आता चित्रपट येत आहेत. ‘चकदा एक्सप्रेस’ हा भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावरील चित्रपट आहे.

अनुष्का या चित्रपटात स्वत: झुलन गोस्वामीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. झुलन गोस्वामीने आयुष्यात कसा संघर्ष केला? तिने यश कसं मिळवलं? त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. यावर्षाच्या सुरुवातीला अनुष्काने या चित्रपटाची घोषणा केली होती. चाकदा एक्सप्रेसच्या निमित्ताने अनुष्का शर्मा बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर परतणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here