आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने धोनीचा फोटो शेअर करत त्याच्यावरच प्रेम केलं व्यक्त


आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामाची उत्सुकता आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं सूरतमध्ये सराव सत्रालाही सुरुवात केलीये. कर्णधार महेंद्र सिंह धोनीही या सरावाला हजेरी लावताना दिसते. सीएसकेच्या खेळाडूंचे सरावा दरम्यानचे फोटोही समोर येत आहेत. त्यात दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल पार्वती नायरच्या एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. पार्वतीने धोनीचा एक फोटो ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय.

पार्वतीने खास कॅप्शनसह शेअर केलाय फोटो

पार्वतीने फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिल आहे. तिने लिहिलंय की, आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होत आहे. नवे संघही यंदाच्या हंगामात दिसतील. पण सगळ्यांचे लक्षे फक्त एकाकडेच असेल.आयपीएल २०२२ च्या हंगामात ओन्ली वन महेंद्रसिंह धोनी. पार्वतीने जो फोटो शेअर केलाय त्यात धोनी नेट्समध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते.

याआधीही पार्वतीनं दाखवलं होते धोनीवरील विराट प्रेम

मागील हंगामातही पार्वती नायरच्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली होती. तिने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला होता. या दोघांमधील मैत्री अतूट आणि प्रेमळ आहे, असा उल्लेख तिने केला होता.

कोण आहे पार्वती नायर?

पार्वती नायर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय सोशल मीडियावरही ती चांगली प्रसिद्ध आहे. पार्वती नायरने २०१२ मध्ये मल्याळम चित्रपट पॉपिन्स मधून कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘स्टोरी काथे’ या चित्रपटात तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here