आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
डोंबिवलीकर क्रिकेटपटूने त्याच्या शाळेला भेट देऊन जागवल्या रम्य आठवणी! व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील तुमच्या शाळेची आठवण येईल
भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे नुकताच डोंबिवली मधील एस. व्ही. जोशी हायस्कुलला भेटायला गेला होता. यावेळी रहाणे शालेय जीवनातल्या आठवणीमध्ये रमल्याचं चित्र दिसून आलं. अर्थात यामागचे कारण म्हणजे मूळचा डोंबिवलीकर असणाऱ्या रहाणेने त्याचं शालेय शिक्षण याच शाळेत पूर्ण केलंय.
मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा रहाणेला सध्या विश्रांती देण्यात आलीय. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळेच या मोकळ्या वेळात कुटुंबासोबत काही निवांत क्षणांचा आनंद घेतोय. नुकतीच त्याने आपल्या डोंबिवलीमधील शाळेला भेट दिली. याबद्दलची माहिती त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करुन दिलीय.
https://www.instagram.com/tv/Ca327VZl6DA/?utm_source=ig_web_button_share_sheet
“बऱ्याच वर्षांपासून मनात होतं की इथे (डोंबिवलीमधील शाळेत) यावं. कारण मी इथूनचा माझा क्रिकेट प्रवास सुरु केला. तुमच्या आयुष्यातील काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देण फारच खास असतं. असं केल्याने तुमचं जमीनीशी असणारं नातं कायम राहतं. नुकताच मी डोंबिवलीमध्ये माझ्या कुटुंबासोबत गेलो होतो. जागा कितीही बदलली असली तरी या जागेचं माझ्या मनातील स्थान आहे असेच आहे,” असं अजिंक्याने इन्स्टाग्राम शाळेला भेट दिल्याचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय.
रहाणे पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत डोंबिवलीमधील क्रिकेट मैदानावरही जाऊन आला. लहानपणी ज्या मैदानावर सरावर केला त्याच मैदानाबद्दल तो मोठ्या आपुलकीने पत्नीला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता. “मला अनेक वर्षांपासून इथे यायचं होतं पण हे आज शक्य झालं. मी इथूनच क्रिकेटची सुरुवात केली. शाळेने मला पाठिंबा दिला. इथे येणं हे फार खास आहे,” असं रहाणेनं म्हटलंय.
रहाणे सध्या चांगली कामगिरी करत नसून तो खराब फॉर्मशी झुंज देताना दिसतोय. तो २०२२ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळताना दिसणार आहे. केकेआरच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन अजिंक्यच्या या व्हिडीओवर मराठीमध्ये खूप छान अशी कमेंट केलीय.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.