आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी झाल्यावर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते? ऐका खुद्द या खेळाडूंच्या पत्नींकडून!
क्रिकेटपटूशी लग्न झाल्यावर आयुष्यात नेमके कोणते बदल होतात, यावर क्रिकेटपटूंच्या पत्नींची जोरदार चर्चा रंगली होती. चेन्नई सुपर किंग्स ने महिला दिनानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नईच्या संघातील खेळाडूंच्या पत्नी एकमेकींशी गप्पा मारताना दिसत आहेत. क्रिकेटपटूंच्या पत्नींचं आयुष्य कसं असतं? या विषयावर त्यांना आलेले अनुभव यावेळी त्यांनी शेअर केले.
यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी जगज्जेता आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीनेही तिला आलेले अनुभव सांगितले. पत्नी म्हणून पतीच्या क्रिकेट मैदानावरील कामगिरीचा कसा अभिमान वाटतो, तसेच खेळाडूंमध्ये अव्वल स्थान गाठणे किती कठीण असते, यावरही साक्षी बोलली.
साक्षी म्हणाली की, ‘ क्रिकेटपटूशी लग्न केल्यावर खूप बदल करावे लागतात आणि आपल्या जोडीदाराला आरामदायी आयुष्य देण्यासाठी महिलांना अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावे लागते. जेव्हा तुम्ही लग्न करता आणि तुमचा जोडीदार ऑफिसला जातो, तेव्हा तुमचे सामान्य जीवन बदलते, पण आमचे पती खेळायला जातात. मला असे वाटते की, महिलांना त्यांच्या पतीच्या इच्छेनुसार स्वत:ला बदलावे लागते, त्यांच्याशी ताळमेळ जमवावा लागतो.’
एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी होण्याच्या आव्हानांबद्दलही साक्षी बोलली. तिने सांगितले की, ‘लोक नेहमी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तयार असतात आणि कॅमेऱ्यासमोर स्वत:ला नैसर्गिक ठेवणे कठीण असते. तुमच्याकडे तुमची स्वतःची खाजगी जागा राहत नाही आणि जसे तुम्ही नेहमी राहता, त्याप्रमाणे कॅमेरासमोर राहू शकत नाही. काही लोक कॅमेर्यासमोर आरामदायक राहतात, परंतु काहींना ते जमत नाही. विशेषत: तेव्हा जेव्हा तुम्ही लोकांसमोर येता आणि ते तुम्हाला प्रश्न विचारत असतात. कधी कधी असं होतं की, तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवत असता आणि तरीही लोक तुमच्याबद्दल बोलू लागतात. त्यामुळे तुमचे खासगी आयुष्य उरतच नाही.’
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.