आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रंभा मेनकेहून ही दिसते तू सुंदर अप्सरा! ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटोशूट ठरले लक्षवेधी


भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही तिच्या फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते. सोशल मिडियावर ती खूपच  सक्रिय असल्याचं दिसतं. धनश्री दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे फार आजारी होती. पण गेल्या महिन्यात तिने बॉक्सिंग रिंगमधील एक फोटो शेअर करत पुन्हा तंदुरूस्त झाल्याचं जाहीर केलं.

आपला कोरोनाकाळातील अनुभव तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मांडला. अतिशय भावूक होऊन तिने आपली परिस्थिती शब्दात व्यक्त केली. पण सध्या मात्र ती तंदुरूस्त असून तिच्या एका छानशा फोटोशूटमुळे ती चर्चेत आहे. बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्रींनाही लाजवेल असे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

धनश्री ही एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्यामुळे आपल्या फिटनेसकडे ती विशेष लक्ष पुरवते. ती तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे चर्चेचा विषय ठरत असते. धनश्रीचा पती युजवेंद्र चहल संघाबरोबर दौऱ्यासाठी परदेशात जात असतो. बरेचदा ती देखील त्याच्यासोबत तिथे जाते आणि सुटी एन्जॉय करते.

परंतु गेल्या काही दौऱ्यांवर धनश्री युजीबरोबर जात नाही. त्याचं कारण तिने स्वत:च्या नृत्य अकादमी मध्ये खूप परिश्रम घेत आहे. तशातच तिने केलेल्या अतिशय सुंदर अशा फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या फोटोवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. धनश्रीच्या सौदर्याची चर्चा कायमच तरूणाईमध्ये असते. तसेच तिच्या डान्स व्हिडीओंचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here