आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘या’ खेळाडूचे लग्न नात्यात करायचे असूनही ते जमवण्यासाठी त्याला बरेच खटाटोप करावे लागले होते!


भारतीय क्रिकेट चा महत्त्वाचा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग. जेवढी त्याची फलंदाजी मनोरंजक असायची तेवढीच त्याच्या लग्नाची कहाणी देखील उत्सुकता वाढवणारी आहे. वीरेंद्र सेहवाग ७ वर्षांचा असताना ते आपली पत्नी आरतीला अहलावतला पहिल्यांदा भेटले.

आरतीच्या आत्याचे लग्न सेहवागच्या चुलत भावाशी झाले होते. या हिशेबाने दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक झाले होते. आरतीच्या मोठ्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितले होते की वीरेंद्र सेहवाग आणि आरतीचे लग्न कुटुंबियामध्येच झाले आहे. हे लव्ह मॅरेज होते. या लग्नाआधी वीरेंद्र आणि आरती यांच्यात दीर-वहिनीचे नाते झाले होते.

२००४मध्ये सेहवाग आणि आरती यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. आरती आणि वीरेंद्र सेहवाग यांना आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुले आहेत. खास बाब म्हणजे सेहवागचे लग्न माजी दिग्गज नेता अरूण जेटली यांच्या सरकारी बंगल्यात झाले होते. २००२मध्ये सेहवागने मजेमजेत आरतीला लग्नासाठी विचारले. आरतीने हा प्रश्न गंभीरतेने घेतला आणि याचे उत्तर दिले. तिने लग्नासाठी होकार दिला. ही बाब खुद्द सेहवागने एका मुलाखतीत सांगितली.

लग्नासाठी सेहवाग तयार होता, दुसरीकडे आरतीही तयार होती. मात्र सेहवागला आपल्या कुटुंबियांना समजावण्यासाठी खूप वेळ लागला. एका मुलाखतीत सेहवागने सांगितले होते, आमच्या कुटुंबामध्ये जवळच्या नात्यात लग्न होत नाहीत. आमच्या लग्नासाठी आमचे कुटुंबीय तयार नव्हते. थोडा वेळ लागला. त्यांच्यासाठी या लग्नाला मंजुरी देणे खूप कठीण होते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here