आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शेन वॉर्नला मृत्यूच्या केवळ चार तास भेटला होता ‘हा’ गूढ व्यक्ती; त्याचा वॉर्नच्या मृत्यूशी खरंच काय संबंध असेल?


ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचे ४ मार्चला थायलंड येथे निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टी व्यतित करण्यासाठी गेला होता, आणि तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांना कोणत्याही प्रकारची गडबड आढळून आलेली नाही. मात्र असे असले तरी, आता शेन वॉर्नच्या शेवटच्या काही क्षणांसंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. यातच एका व्यक्तीसंदर्भात एक नवीन गोष्ट समोर आली आहे.

शेन वॉर्नला शेवटचं जिवंत पाहणाऱ्या लोकांमध्ये एक ४४ वर्षीय परशुराम पांडे या व्यक्तीचा समावेश आहे. परशुराम पांडे यांना मृत्यूच्या काही तास आधीच शेन वॉर्नने भेट घेतली होती. ते थायलंडमध्ये शेन वॉर्न राहत होता त्याच रिसॉर्टजवळ टेलरचे दुकान चालवतात.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, ४ मार्चला दुपारी एक वाजताच्या सुमारास शेन वॉर्न ब्रिओनी टेलर शॉपवर गेला होता. परशुराम पांडेंकडे तो यापूर्वीही पोहोचला होता. वर्ष २०१९ मध्ये त्याने येथून जवळपास १० सूट विकत घेतले होते.

परशुराम पांडे यांनी डेलीमेलला सांगितल्यानुसार, जेव्हा शेन वॉर्न आला होता, तेव्हा खूप आनंदी होता. कारण तो बऱ्याच दिवसांनंतर थायलंडला आला होता. शेन वॉर्न दुकानावर पोहोचला तेव्हा त्याने परशुराम पांडे यांची गळाभेटही घेतली होती. मात्र, त्यानंतर चार तासांनीच शेन वॉर्नचे निधन झाल्याचे समोर आले.

परशुराम पांडे सांगतात की, शेन वॉर्न एक उत्तम ग्राहक होता आणि मीदेखील त्याचा मोठा चाहता होतो. शेन वॉर्न ज्या मित्रांसोबत येथे थांबलेला होता, त्यांपैकी एका मित्रानेही येथून सूट विकत घेतले होते. शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाने परशुराम पांडेलाही धक्का बसला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here